१० पटांच्या शाळा बंद करू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2017 09:32 PM2017-12-10T21:32:27+5:302017-12-10T21:32:47+5:30

१० पटसंख्या असलेल्या शाळा बंद करू नये, यासाठी देवरी येथील पंचायत समितीसमोर देवरी तालुका शिक्षक कृती समितीच्यावतीने धरणे आंदोलन करण्यात आले.

Do not close 10-fold schools | १० पटांच्या शाळा बंद करू नका

१० पटांच्या शाळा बंद करू नका

Next
ठळक मुद्देधरणे आंदोलन : शिक्षक कृती समितीचा बेमुदत शाळा बंदचा इशारा

आॅनलाईन लोकमत
चिचटोला : १० पटसंख्या असलेल्या शाळा बंद करू नये, यासाठी देवरी येथील पंचायत समितीसमोर देवरी तालुका शिक्षक कृती समितीच्यावतीने धरणे आंदोलन करण्यात आले. तसेच १० पटाच्या शाळा बंद करण्याचा निषेध कृती समितीतर्फे करण्यात आला.
मोर्चाची सुरूवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पणाने झाली. देवरी शहरातून शासनाच्या विरोधात घोषणा देत रॅली काढण्यात आली. त्यानंतर पंचायत समितीसमोर धरणे आंदोलनाला सुरूवात झाली. प्रास्ताविक सपना श्यामकुवर यांनी मांडले. तसेच तालुका समन्वयक संदीप तिडके यांनी मार्गदर्शनातून, ग्रामीण संस्कृतीचे रक्षण करणारी व विद्यार्थ्यांमध्ये नैतिक मूल्ये रूजविणारी जिल्हा परिषद शाळा म्हणजे संस्कार केंद्र आहेत, असे मत व्यक्त केले. या वेळी सारंगधर गभणे, गजानन पाहणकर, चेतन उईके, वितेश खांडेकर, राजकुमार बारसे, शितल कनपटे यांनी मार्गदर्शन केले.
तसेच १० पटाच्या शाळा बंद करण्याचा निर्णय शासनाने मागे घेतला नाही तर सामूहिक रजा काढून बेमुदत शाळा बंद करण्याचा इशारा दिला. या वेळी पुन्हा शिक्षण विभाग देवरीचा ढिसाळ कारभार व शिक्षक विरोधी धोरण चव्हाट्यावर आले. शिक्षण विभागाचे एकही अधिकारी पंचायत समितीत उपस्थित नव्हते. सभास्थळी पं.स. सभापती देवकी मरई, गटविकास अधिकारी व्ही.बी. हिरूडकर, अधीक्षक कापगते उपस्थित राहून पं.स. देवरी अंतर्गत एकही शाळा बंद केली जाणार नाही, असे सांगितले.
याप्रसंगी कृती समितीतर्फे आॅनलाईन कामे, डीसीपीएस कपात, बीएलओ कामे व धान्यादी साहित्य मिळेपर्यंत खिचडी शिजविण्यावर पुढील वर्षापासून १०० टक्के बहिष्कार घालण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला.
यावर्षी ईच्छूक नसणाºया केंद्रांवर कोणतीही कार्यवाही केली जाणार नाही, असे आश्वासन प्रशासनाच्या वतीने देण्यात आले. तसेच चार महिन्यांपासूनचे प्रलंबित धान्यादी साहित्याचे देयक अदा करणे, प्रलंबित देयक अदा करणे, संपूर्ण देवरी तालुका अवघड करणे, सेवापुस्तके अद्यावत करणे व इतर मागण्यांसंदर्भात लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन गटविकास अधिकारी व्ही.बी. हिरूडकर यांनी दिले.
या वेळी शेकडोच्या संख्येत शिक्षक उपस्थित होते. संचालन करून आभार रमेश उईके यांनी मानले. धरणे आंदोलनात संदीप तिडके, सारंग गभणे, गजानन पाहणकर, विनोद चौधरी, वितेश खांडेकर, सुरेश कश्यप, रमेश उईके, चेतन उईके, विनोद बहेकार, आदेश धारगावे, दीपक कापसे, शितल कनपटे, मिथून चव्हाण, सुनील चव्हाण, राजकुमार बारसे, एम.सी. हुड्डा, विशाल कच्छवाये, जितू कोहाडकर, जीवन आकरे, आर.डी. गणवीर, अशोक बन्सोड, प्रवीण सरगर, तेजराम नंदेश्वर, दिनेश इनवाते, अविरत सय्याम, अरूण सावरकर, विरेंद्र खोटेले, प्रकाश गावडकर, ज्योती डाबरे, सपना श्यामकुवर, प्रगती निखाडे, वर्षा वालदे, रेखा पायधन, गायत्री आत्राम यांच्यासह समितीतील अन्य शिक्षक सहभागी झाले होते.

शिक्षण समितीच्या सभेत १० पटाच्या शाळा बंद न करण्याचा ठराव घेण्यात आला. हा निर्णय समाजहिताचा असून त्यासाठी शिक्षण सभापती पी.जी. कटरे, सर्व शिक्षण समिती सदस्य तथा शिक्षणाधिकारी उल्हास नरड यांचे आभार. हा विजय देवरी शिक्षक कृती समितीमधील सर्व पदाधिकारी व रस्त्यावर उतरून संघर्ष करणाºया सर्व शिक्षक बांधवांचा आहे.
संदीप तिडके,
समन्वयक, तालुका शिक्षक कृती समिती, देवरी.

Web Title: Do not close 10-fold schools

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.