विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2018 12:15 AM2018-08-09T00:15:34+5:302018-08-09T00:17:09+5:30

शहरी भागातील विद्यार्थ्यांना वेळोवेळी विविध वैज्ञानिक उपक्रमामधून माहिती मिळत असते. परंतु ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना तालुकास्तरीय विज्ञान मेळाव्याच्या शिवाय माहिती मिळत नाही. अशा तालुकास्तरीय विज्ञान मेळाव्यातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लागण्यास मदत होते, असे प्रतिपादन प्राचार्य नरेंद्र काडगाये यांनी केले.

Develop a scientific approach among students | विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करा

विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करा

Next
ठळक मुद्देनरेंद्र काडगाये : तालुका स्तरीय विज्ञान मेळावा, तालुक्यातील २६ शाळांचा सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्क
केशोरी : शहरी भागातील विद्यार्थ्यांना वेळोवेळी विविध वैज्ञानिक उपक्रमामधून माहिती मिळत असते. परंतु ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना तालुकास्तरीय विज्ञान मेळाव्याच्या शिवाय माहिती मिळत नाही. अशा तालुकास्तरीय विज्ञान मेळाव्यातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लागण्यास मदत होते, असे प्रतिपादन प्राचार्य नरेंद्र काडगाये यांनी केले.
पंचायत समिती अर्जुनी-मोरगाव शिक्षण विभागातंर्गत अखिल भारतीय तालुकास्तरीय विज्ञान मेळावा नवोदय हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय केशोरी येथे नुकताच पार पडला. यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. उद्घाटन काडगाये यांच्या अध्यक्षतेखाली गटशिक्षणाधिकारी सिरसाटे यांचे हस्ते करण्यात आले. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच अश्विनी भालाधरे, तालुका विज्ञान समन्वयक ढोके, नंदेश्वर, मुख्याध्यापक विजय गोंडाणे, शालीक कोरे, सेवानिवृत्त शिक्षक एम.एम.लोथे, धनंजय खुणे, राजू पातोडे, यशवंत बोरकर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात डॉ. एपीजे अब्दुल कलाम, सरस्वती मातेच्या छायाचित्राला मार्ल्यापण करुन करण्यात आली. काडगाये म्हणाले, डॉ. एपीजे अब्दुल कलाम हे लहानशा खेड्यातूनच भारताचे महान थोर शास्त्रज्ञ होवून गेले. त्यांच्यासारखी जिद्द, चिकाटीने महान शास्त्रज्ञ होण्याचे स्वप्न उराशी बाळगून यशस्वी होण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केले.
विज्ञान मेळाव्यात तालुक्यातील २६ शाळांनी सहभाग घेतला. यात प्रथम अनघा राजेश पिल्लेवार सरस्वती विद्यालय अर्जुनी-मोरगाव, द्वितीय नयन प्रकाश तिरपुडे जीएमबी हायस्कूल अर्जुनी-मोरगाव यांने व्दितीय क्रमांक पटकाविला. प्रास्ताविक राजेश पातोडे यांनी केले. संचालन मनोहर पाऊलझगडे यांनी तर आभार नरेंद्र गोस्वामी यांनी मानले.

Web Title: Develop a scientific approach among students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.