केंद्राच्या योजना आणून विकास करु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2019 11:51 PM2019-05-24T23:51:27+5:302019-05-24T23:52:59+5:30

गोंदिया-भंडारा जंगल व तलावांचे जिल्हे म्हणून ओळखले जातात. त्याचा शेतकऱ्यांचा सिंचनासाठी कसा उपयोग होईल तसेच यावर आधारित केंद्र शासनाच्या योजना आणून कसा विकास साधता जाईल. यादृष्टीने प्रयत्न करण्याचे आश्वासन नवनिर्वाचित खासदार सुनील मेंढे यांनी दिले.

Develop the center plans and bring development | केंद्राच्या योजना आणून विकास करु

केंद्राच्या योजना आणून विकास करु

Next
ठळक मुद्देनवनिर्वाचित खा.सुनील मेंढे यांचे जंगी स्वागत

लोकमत न्यूज नेटवर्क
अर्जुनी मोरगाव : गोंदिया-भंडारा जंगल व तलावांचे जिल्हे म्हणून ओळखले जातात. त्याचा शेतकऱ्यांचा सिंचनासाठी कसा उपयोग होईल तसेच यावर आधारित केंद्र शासनाच्या योजना आणून कसा विकास साधता जाईल. यादृष्टीने प्रयत्न करण्याचे आश्वासन नवनिर्वाचित खासदार सुनील मेंढे यांनी दिले.
अर्जुनी-मोरगाव येथील वात्सल्य सभागृहात शुक्रवारी (दि.२४) आयोजित सत्कार सभारंभात ते बोलत होते. अर्जुनी-मोरगाव विधानसभा क्षेत्रातील मतदारांचे आभार व्यक्त करण्यासाठी ते आले होते. ढोल-ताशाच्या गजरात फटाके फोडून व पेढे वाटून आनंद व्यक्त करण्यात आला. वात्सल्य सभागृहात एका सभेचे आयोजन करण्यात आले. या वेळी नवनिर्वाचित खासदार सुनील मेंढे, पालकमंत्री राजकुमार बडोले, भाजपचे जिल्हाध्यक्ष हेमंत पटले, पं.स.चे सभापती अरविंद शिवणकर, नगरसेवक देवेंद्र टेंभरे, बाजीराव तुळशीकर, जि.प.चे माजी बांधकाम सभापती प्रकाश गहाणे व भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.
मेंढे म्हणाले, लोकसभेची निवडणूक एक परीक्षा होती. त्या परीक्षेत मतदारांच्या आशिर्वादामुळे आपण उत्तीर्ण झालो. हे जनतेचा आशिर्वाद व कार्यकर्त्यांच्या मेहनतीचे फळ आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५ वर्षे कुठलीही रजा न घेता देशासाठी जे काम केले त्याची ही पावती आहे. मी नेता नाही, यापूर्वी कुठलीही आमदारकीची निवडणूक लढलो नाही. केवळ भंडारा नगरपरिषदेचा अध्यक्ष आहे. वंशपरांपरागत राजकीय वलय नसताना सामान्य कार्यकर्त्यापासून खासदार बनलो. मला हा बहुमूल्य सम्मान कार्यकर्त्यांची मेहनत व मतदारांच्या आशिर्वादामुळे प्राप्त झाला. मागील खासदारांनी पक्षाशी बेईमानी केली. दुसºया पक्षात प्रवेश केला. व बाहेरच्या मतदारसंघातून निवडणूक लढली. त्यांना आमच्या नेत्याने त्यांची जागा दाखविली. त्यांच्या कार्यकाळात विकास कामांचा जो अनुशेष होता ती व नवीन भरीव विकासाची कामे करण्याचा आपला मानस असल्याचे त्यांनी सांगितले.
ना.राजकुमार बडोले म्हणाले, कार्यकर्त्यांची मेहनत व मतदारांच्या सहकार्यामुळे भाजपचा येथे विजय झाला. पोट निवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेसची मतांची आघाडी संपवून त्यापेक्षा अधिकची आघाडी आम्ही या विधानसभा क्षेत्रात घेतली. आपण ज्या विश्वासाने मताधिक्य दिले त्याच विश्वासाने जनतेच्या अपेक्षांची पूर्तता करु.या विश्वासाला तडा जाणार नाही अशी हमी त्यांनी दिली.
पत्रकार संघाने
दिले निवेदन
नवेगावबांध राष्ट्रीय उद्यानातील संकुल परिसरात १० वर्षापूर्वी कोट्यवधी रुपये खर्च करुन गार्डन व कान्फरन्स हॉलचे एका कन्स्ट्रक्शन कंपनीच्या माध्यमातून करण्यात आले. या कालावधीत वापर न होता सुद्धा ते डागडुजीस आले आहे. शासन व प्रशासनच्या कुंभकर्णी निद्रेमुळे ते अद्यापही तसेच आहे. त्याचे लोकार्पण अजूनही होऊ शकले नाही.याची दखल घेण्याचे निवेदन तालुका पत्रकार संघातर्फे खा.सुनील मेंढे यांना देण्यात आले.

Web Title: Develop the center plans and bring development

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.