पराभव हीच भविष्यातील विजयाची चावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2018 11:38 PM2018-12-16T23:38:59+5:302018-12-16T23:39:43+5:30

पराभव हीच भविष्यातील विजयाची चावी आहे. हे सत्य स्वीकारून खेळभावनेने खेळलेल्या खेळाडूंचे अभिनंदन करीत पोलीस विभागाने राज्यस्तरीय शहीद जवान फुटबॉल स्पर्धा घेऊन गोंदियाला नावलौकिक मिळवून दिला.

The defeat is the key to winning the future | पराभव हीच भविष्यातील विजयाची चावी

पराभव हीच भविष्यातील विजयाची चावी

Next
ठळक मुद्देप्रफुल्ल पटेल : शहीद जवान राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धा, यंग मुस्लीम क्लब ठरला विजेता

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : पराभव हीच भविष्यातील विजयाची चावी आहे. हे सत्य स्वीकारून खेळभावनेने खेळलेल्या खेळाडूंचे अभिनंदन करीत पोलीस विभागाने राज्यस्तरीय शहीद जवान फुटबॉल स्पर्धा घेऊन गोंदियाला नावलौकिक मिळवून दिला. आरोग्याला लाभदायक असलेल्या प्रत्येक स्पर्धांचे आयोजन करून पोलीस अधीक्षक हरीश बैजल यांनी चांगल्या कार्याची सुरुवात केल्याचे प्रतिपादन अखिल भारतीय फुटबॉल संघाचे अध्यक्ष तथा खा. प्रफुल्ल पटेल यांनी केले.
गोंदिया येथील इंदिरा गांधी स्टेडीयम येथे आयोजित राज्यस्तरीय शहीद जवान फुटबॉल स्पर्धेच्या समारोप व बक्षीस वितरण कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. या वेळी आमदार गोपालदास अग्रवाल, पोलीस उपमहानिरिक्षक अंकुश शिंदे, नगराध्यक्ष अशोक इंगळे, पोलीस अधीक्षक हरीश बैजल, अतिरिक्त पोलीस अधीक्षक संदीप आटोळे, गोंदिया जिल्हा फुटबॉल संघाचे पदाधिकारी व शहीद जवानांचे कुटूंबीय उपस्थित होते. फुटबॉल स्पर्धेच्या आयोजनामुळे ग्रामीण भागातील खेळाडूंना राष्टÑीय व आंतरराष्टÑीय स्तरावर खेळण्याची संधी मिळाली असल्याचे सांगितले.
राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेसाठी हा मैदान हिरवेगार करून द्या मी राष्ट्रीय नाही तर आंतरराष्ट्रीय स्तराचा एक लीग सामना या ठिकाणी घेण्याची जबाबदारी स्विकारतो असे म्हणत गोंदियाला फुटबॉलच्या क्षेत्रातही आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव मिळवून देण्याचा आपला प्रयत्न राहणार असल्याची ग्वाही देत शिस्तीने काम करणाऱ्या पोलिसांसोबत शहीद जवानांचे बलीदान विसरता येणारे नसल्याचे विचार बैजल यांनी व्यक्त केले. बक्षीस वितरण सामन्यापूर्वी स्पर्धेचा अंतिम सामना यंग मुस्लीम क्लब नागपूरविरूध्द राहूल फुटबॉल क्लब नागपूर यांच्यात चांगलाच रंगला. यामध्ये सामन्याच्या मध्यान्यपुर्वी यंग मुस्लीम क्लब नागपूरने १-० अशी आघाडी घेत खेळावर आपली पकड घट्ट करीत विजय संपादन केला. राहुल क्लबच्या खेळाडूंनी अनेकदा गोल करण्याचा प्रयत्न केला. परंतु बालकिपरच्या उत्कृष्ठ कामिगरीने राहुल फुटबॉल क्लबला गोल करता आले नाही. हा सामना एवढा चुरशीचा झाला की प्रेक्षकांनी तीन दशकानंतर फुटबॉलच्या सामन्याचा खरा आस्वाद घेतल्याचे चित्र इंदिरा गांधी क्रीडा संकुलावर पाहयला मिळाले. खेळाडूंच्या प्रत्येक हालचालीवर प्रेक्षकांनी त्यांना दाद देत प्रोत्साहित केले. क्रिकेट व फुटबॉलच्या राष्ट्रीय सामन्यामध्ये जसा प्रेक्षकांचा जल्लोष असतो तसाच जल्लोष अंतिम सामन्याच्यावेळी पाहयला मिळाला. या वेळी उपस्थित अन्य मान्यवरांनी सुध्दा विचार व्यक्त केले.

Web Title: The defeat is the key to winning the future

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.