घराच्या छतावरून पडून युवतीचा मृत्यू, व्यवसायाने होती इंजिनिअर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2019 04:50 PM2019-06-24T16:50:41+5:302019-06-24T16:51:27+5:30

दीक्षा ही आज काही कामानिमित्त घराच्या छतावर गेली असल्याचे सांगण्यात येते.

The death of a young woman fell on the roof of the house, the engineer from the profession | घराच्या छतावरून पडून युवतीचा मृत्यू, व्यवसायाने होती इंजिनिअर

घराच्या छतावरून पडून युवतीचा मृत्यू, व्यवसायाने होती इंजिनिअर

googlenewsNext

देवरी, (गोंदिया) : तालुक्यातील सावली येथील एका युवतीचा घराच्या छतावरून पडून मृत्यू झाल्याची घटना सोमवार सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास घडली. मृत्यूमुखी पडलेल्या युवतीचे नाव दीक्षा देवनाथ बिंझलेकर (वय २४) असे आहे.

प्राप्त माहितीनुसार दीक्षा ही आज काही कामानिमित्त घराच्या छतावर गेली असल्याचे सांगण्यात येते. छतावरून तिचा तोल गेल्याने ती खाली पडून डोक्याला गंभीर दुखापत झाली. तिला उपचारासाठी मुल्ला येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले असता तेथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. सदर युवती ही व्यवसायाने इंजिनिअर असून ती नागपूरच्या एका खासगी कंपनी कार्यरत असल्याची माहिती आहे. उल्लेखनीय म्हणजे गेल्या एप्रिल महिन्यात तिचा साखरपुडा गोंदिया तालुक्यातील तुमखेडा येथील युवकाशी झाला होता. या घटनेने सावली गावात शोककळा पसरली आहे.
 

Web Title: The death of a young woman fell on the roof of the house, the engineer from the profession

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.