तंटे होणार नाही असे गाव निर्माण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2018 10:01 PM2018-01-20T22:01:24+5:302018-01-20T22:01:37+5:30

व्यसनाधीनता ही समाजाला लागलेली मोठी कीड आहे. व्यसनाच्या आहारी जाऊन अनेक तरुण वाईट मार्गाला लागत आहे. गावातील अवैध धंद्यामुळे वातावरण कलुषीत होवून तंटे निर्माण होतात. यासर्व प्रकारामुळे महिलांमध्ये असुरक्षीतेची भावना निर्माण होत आहे.

Create a village that is not contagious | तंटे होणार नाही असे गाव निर्माण करा

तंटे होणार नाही असे गाव निर्माण करा

Next
ठळक मुद्दे सत्यपाल महाराज : गोठणगाव येथे प्रबोधन कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्क
नवेगावबांध/गोठणगाव : व्यसनाधीनता ही समाजाला लागलेली मोठी कीड आहे. व्यसनाच्या आहारी जाऊन अनेक तरुण वाईट मार्गाला लागत आहे. गावातील अवैध धंद्यामुळे वातावरण कलुषीत होवून तंटे निर्माण होतात. यासर्व प्रकारामुळे महिलांमध्ये असुरक्षीतेची भावना निर्माण होत आहे. त्यामुळे गावकºयांनो गावातून अवैध धंदे बंद करण्याचा आणि व्यसन न करण्याचा संकल्प करा. तंटेच निर्माण होणार नाही असे आदर्श गाव निर्माण करा, असा महत्त्वपूर्ण संदेश प्रसिध्द सप्त खंजरी वादक सत्यपाल महाराज यांनी येथे आयोजित कार्यक्रमात गावकऱ्यांना दिला.
अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील आदिवासी बहूल भागातील गोठणगाव येथे सुजल बहुउद्देशिय सामाजिक सेवा समिती नवेगावबांध व तंटामुक्त ग्राम समिती गोठणगाव आणि ग्रामपंचायत गोठणगाव यांच्यातर्फे शुक्रवारी (दि.१९) प्रसिध्द सप्त खंजरी वादक सत्यपाल महाराज यांच्या जाहीर कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या वेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला राष्ट्रधर्म प्रचारक समिती, गुरूदेव सेवा मंडळाने राष्ट्रसंतांची सामुदाईक प्रार्थना सादर केली. यानंतर बाल व्याख्यानकार संजीवनी कृष्णकांत खोटेले हिचे व्याख्यान झाले. जि. प. सदस्य गंगाधर परशुरामकर, मनोहर चंद्रीकापुरे, रतिराम राणे, सुशीला हलमारे, योगेशजी नाकाडे, लोकपाल गहाणे, सरपंच जिजाबाई चांदेवार, तंमुस अध्यक्ष नरेंद्र कोळापे, पोलीस पाटील कारुसेना सांगोळे, किशोर तरोणे उपस्थित होते.सत्यपाल महाराज म्हणाले, युवकांनो राजकारणाकडे वळण्यापेक्षा शिक्षण घेऊन चाकरीकडे वळा. माय लेकीनों पुस्तके वाचा, सावित्री जिजाई, भिमाई व रमाई बना, त्याशिवाय शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घडणार नाहीत. परंतु शोकांतिका आहे, माय लेकी हो आपण पुस्तके, ग्रामगीता व संविधान वाचत नाही. त्यामुळे समाजाची प्रगती होत नाही. शिक्षणाच्या अभावामुळे अंधश्रध्दा, भ्रुण हत्त्येवर विश्वास ठेवला जातो. त्यामुळे समाजाची प्रगती खुंटते, त्यामुळे अंधश्रध्दा मानू नका, भ्रुण हत्या करु नका, मुला पेक्षा मुलगी बरी, प्रकाश देते दोन्ही घरी या म्हणी प्रमाणे खास करुन माय लेकींनो भ्रुण हत्त्येला विरोध करा. असा संदेश सत्यपाल महाराजांनी दिला.
उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा सत्कार
आयोजकांच्या वतीने सत्यपाल महाराजांचा शाल व श्रीफळ देऊन मनोहर चंद्रीकापुरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच समाजात नाविण्यपूर्ण उपक्रम राबविणारे रामदास बोरकर, दुर्योधन मैंद, विजय डोये, राधेश्याम तरोणे, शकुंतला वालदे, गोवर्धन बडवाईक, अरुण ढवळे, राकेश वट्टी, हिरामन नंदनवार, राजू फुंडे, विलास राऊत, संदीप येरणे, चिंतामन शिवणकर, भाऊदास गायकवाड, ओमप्रकाश येळे, पप्पू पवार, चिंतामन हटवार, हरिचंद मेश्राम, नरेंद्र कोडापे, जिजा चांदेवार, शारदा नाकाडे यांचा सत्कार करण्यात आला.

Web Title: Create a village that is not contagious

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.