The continuous fasting of the non-functional contract ANM has been continued | कार्यमुक्त कंत्राटी एएनएमचे साखळी उपोषण सुरूच

ठळक मुद्देमागण्या मार्गी लावा : विविध संघटनांचा पाठिंबा

आॅनलाईन लोकमत
गोंदिया : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत चार ते पाच वर्षे सेवा केल्यानंतर तीन वर्षांपूर्वी अतिरिक्तच्या नावे ४० पेक्षा अधिक एएनएमला कार्यमुक्त करण्यात आले होते. दरम्यान रिक्त जागांनुसार त्यांचे समायोजन करण्यात येईल, असे आश्वासन त्यांना देण्यात आले होत; मात्र आता तीन वर्षांचा काळ लोटूनही आरोग्य विभागाने त्या कंत्राटी एएनएम यांना कामावर घेतले नाही.
या अन्यायाविरूद्ध कंत्राटी बेरोजगार एएनएम अनेकदा जिल्हा परिषदेत पायपीट केली. मात्र यश न आल्याने त्यांनी सोमवारपासून (दि.४) जिल्हा परिषद कार्यालयासमोर बेमुदत साखळी उपोषण सुरू केले आहे.
त्यांच्या उपोषणाला कास्ट्राईब कर्मचारी संघटना व शेतकरी संघटनेने पाठिंबा दिला आहे. आता तरी जिल्हा परिषद प्रशासन न्याय देणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मागील तीन वर्षांपासून कामावर रूजू होण्याच्या प्रतीक्षेत ४० हून अधिक बेरोजगार कंत्राटी एएनएम सातत्याने जिल्हा परिषदेच्या चकरा मारत होत्या. दरम्यान त्यांनी जि.प. चे पदाधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी व जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन दिले. मात्र मागील तीन वर्षांपासून त्यांच्या आश्वासनांची पूर्तता केली नाही. त्यामुळे कंटाळून त्यांनी कास्ट्राईब कर्मचारी संघटनेचे डॉ. माधवराव कोटांगले, शेतकरी संघटनेचे पदाधिकारी तथा माजी जि.प. सदस्य संजय टेंभरे यांच्या मार्गदर्शनात जि.प. कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू केले आहे. जोपर्यंत न्याय मिळणार नाही, तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवू, अशी भूमिका उपोषणकर्त्यांनी घेतली आहे. उपोषणकर्त्यांमध्ये रंजिता सार्वे, डॉली पालांदूरकर, शीला ठाकरे, शेफाली श्यामकुवर, वर्षा खोब्रागडे, कल्पना बन्सोड, ललिता भोंगाडे, योगेश्वरी सव्वालाखे, माधुरी खेळकर, नीता ढवळे, ममता तितिरमारे, रूपाकुमारी चौधरी, भाग्यश्री झिंगरे, शोभा ठाकरे, प्राची वानखेडे यांचा समावेश आहे.
अनेक पदाधिकाऱ्यांची आंदोलनस्थळी भेट
सदर कार्यमुक्त एएनएम यांच्या उपोषणस्थळी जिल्ह्यातील अनेक पक्ष व संघटनांचे पदाधिकारी भेट देवून आपला पाठिंबा दर्शवित आहे. गुरूवारी (दि.७) माजी आमदार दिलीप बन्सोड, बहुजन एम्पॉईज संघटनेचे अध्यक्ष सुरेंद्र खोब्रागडे, डॉ.डी.बी. डहाट, कास्ट्राईब कर्मचारी संघटनेचे डॉ. माधवराव कोटांगले, शेतकरी संघटनेचे संजय टेंभरे आदी मान्यवरांनी सदर उपोषणस्थळी भेट देऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. सदर मान्यवरांच्या उपस्थितीत जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.रवींद्र ठाकरे यांना निवेदन देऊन चर्चा केली. यावर मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सदर कार्यमुक्त कंत्राटी एएनएम यांचे समायोजन करण्यात यावे, अशा आशयाचे पत्र वरिष्ठांना पाठविण्याचे आश्वासन दिले.


Web Title: The continuous fasting of the non-functional contract ANM has been continued
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.

प्रमोटेड बातम्या

प्रमोटेड बातम्या

गोंदिया अधिक बातम्या

तलाठी कार्यालय नावापुरतेच

तलाठी कार्यालय नावापुरतेच

22 hours ago

तेंदुपत्ता हंगाम यंदाही ‘फिका-फिका’

तेंदुपत्ता हंगाम यंदाही ‘फिका-फिका’

22 hours ago

ठाणेगावातील घर जळून खाक

ठाणेगावातील घर जळून खाक

22 hours ago

एटीएम कार्ड चोरून पैसे काढणाऱ्यास पकडले

एटीएम कार्ड चोरून पैसे काढणाऱ्यास पकडले

22 hours ago

६०० शेतकऱ्यांचे धान संकटात

६०० शेतकऱ्यांचे धान संकटात

22 hours ago

संपकाळातील तीन दिवसाचे वेतन मिळणार

संपकाळातील तीन दिवसाचे वेतन मिळणार

1 day ago