Congress leaders greeted Baba Saheb | कॉँग्रेस नेत्यांनी केले बाबासाहेबांना अभिवादन
कॉँग्रेस नेत्यांनी केले बाबासाहेबांना अभिवादन

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : संघर्ष यात्रा घेऊन गोंदियात आगमन झाल्यानंतर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, विरोधी पक्ष नेता राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, आमदार गोपालदास अग्रवाल यांनी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ््याला माल्यार्पण करून अभिवादन केले.
शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी, धानाला २५०० रूपये हमी भाव द्यावा तसेच भाजप विरोधी धोरणाच्या विरोधात सुरू राज्यव्यापी संघर्ष यात्रेंतर्गत शुक्रवारी (दि.११) या नेत्यांचे गोंदियात आगमन झाले होते.
याप्रसंगी हर्षवर्धन सपकाळ, माजी मंत्री नसीम खान, प्रदेश युवक कॉँग्रेस अध्यक्ष सत्यजीत तांबे, माजी आमदार सेवक वाघाये, प्रदेश सेवादल अध्यक्ष विलास अवताळे, जनसंघर्ष यात्रा संयोजक आषिष दुआ, एनएसयुआय प्रदेश अध्यक्ष समिर शेख, आशिष देशमुख, मुनाप हकीम, अनंत धारड, श्याम उमाळकर, अतुल लोंढे, सीमा मडावी, उमाकांत अग्निहोत्री, बबनराव तायवाडे, राजु वाघमारे, प्रमोद सोनवाने, रमाकांत ओझा, बंडू सावरंबांधे, रामरतन राऊत, डॉ. योगेंद्र भगत, डॉ. झामसिंग बघेले, सहेसराम कोरोटे, पी.जी.कटरे, पृथ्वीपालसिंग गुलाटी, उषा सहारे, उषा मेंढे, राधेलाल पटले यांच्यासह मोठ्या संख्येत कॉंग्रेस पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.


Web Title: Congress leaders greeted Baba Saheb
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.