गोरेगावजवळील चिखलीत फुलतेय आमराई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2019 10:42 PM2019-05-25T22:42:36+5:302019-05-25T22:43:25+5:30

हवामानातील बदलाचा शेतीवर झपाट्याने परिणाम होत आहे. दर दोन तीन वर्षांनी निर्माण होणाºया दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांवरील कर्जाचे डोंगर वाढत आहे. केलेला लागवड खर्च सुध्दा भरुन निघने कठीण झाल्याने शेती म्हणजे तोट्याचा सौदा अशी भावना शेतकºयांमध्ये निर्माण होत आहे.

Chikhaliat Phuletey Amrai near Goregaon | गोरेगावजवळील चिखलीत फुलतेय आमराई

गोरेगावजवळील चिखलीत फुलतेय आमराई

googlenewsNext
ठळक मुद्देसंडे अँकर । कमी लागवड खर्चात अधिक उत्पादन : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळतोय पर्याय

लोकमत न्यूज नेटवर्क
गोरेगाव : हवामानातील बदलाचा शेतीवर झपाट्याने परिणाम होत आहे. दर दोन तीन वर्षांनी निर्माण होणाºया दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांवरील कर्जाचे डोंगर वाढत आहे. केलेला लागवड खर्च सुध्दा भरुन निघने कठीण झाल्याने शेती म्हणजे तोट्याचा सौदा अशी भावना शेतकºयांमध्ये निर्माण होत आहे. मात्र काही शेतकरी अजुनही शेतीत नवीन नवीन प्रयोग करुन यशस्वी शेती करीत आहे. असाच प्रयोग आ.विजय रहांगडाले यांनी केला असून त्यांनी आपल्या दहा एकर वडिलोपार्जीत शेतीत विविध प्रजातीच्या आंब्याच्या झाडांची लागवड केली. यातून आता उत्पादन निघण्यास सुरूवात झाली आहे. गोरेगावजवळील चिखली परिसरात आमराई फुलत आहे.
तिरोडा विधानसभा मतदारसंघाचे आ.विजय रहांगडाले यांची गोरेगाव तालुक्यातील चिखली येथे १० एकर शेती आहे. राजकारणात व्यस्त असताना सुध्दा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा शेतीवर आवर्जुन जातात. त्यांना सुरूवातीपासूनच शेतीमध्ये रुची आहे. त्यांनी आपल्या दहा एकर शेतीत पांरपरिक पिकाची लागवड करण्याऐवजी विविध प्रजातीच्या आंब्यांच्या झाडांची लागवड करण्याचा निर्णय घेतला.सन २०१३ मध्ये त्यांनी कनेरी, दशहेरी आणि इतर प्रजातीच्या ५०० आंब्याच्या झाडांची लागवड केली. या झाडांना सिंचनाची सोय करण्यासाठी बोअरवेल व शेततळे तयार केले. या झाडांची योग्य काळजी घेतल्याने त्यांची चांगली वाढ झाली. मागील वर्षीपासून त्यातून उत्पादन निघण्यास सुरूवात झाली आहे. कनेरी, दशहेरी आंब्याला बाजारात मोठी मागणी आहे. ८० ते १०० रुपये किलो या आंब्याला दर मिळत असल्याचे रहांगडाले यांनी सांगितले. आंब्याची झाडे लावण्यासाठी एकदाच खर्च आला. त्यानंतर मात्र झाडांची योग्य काळजी घेतल्याने उत्पन्न मिळण्यास सुरूवात झाली.आंब्याच्या विक्रीतून दरवर्षी जवळपास दोन ते तीन लाख रुपयांचे उत्पन्न त्यांना मिळत आहे. एकंदरीत त्यांनी धानाची शेती करण्याऐवजी शेतात नवीन प्रयोग करुन शेतकºयांसमोर आदर्श ठेवला आहे. विशेष म्हणजे ते आता या शेतीत एक हजार फणसाच्या झाडांची लागवड करणार आहेत.
वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथून फणसाची रोपटी मागविली असून पावसाळ्याला सुरूवात झाल्यानंतर त्याची लागवड करणार असल्याचे रहांगडाले यांनी सांगितले.
शेतकऱ्यांनी तीच तीच पिके घेणे टाळावे
रासायनिक खतांचा अधिक वापर आणि तिच तिच पिके घेतली जात असल्याने जमिनीची उत्पादकता कमी होत आहे.त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी केलेला लागवड खर्च सुध्दा भरुन काढणे कठीण झाले आहे. त्यामुळे शेतकºयांनी पांरपरिक पिके घेण्याचे टाळून इतर पिकांची लागवड करावी असे आ.विजय रहांगडले यांनी सांगितले.
२५ लोकांना मिळाला रोजगार
चिखली येथील शेतात लावलेल्या आंब्याच्या झाडांचे योग्य संगोपन करण्यासाठी २५ मजूर नियमित काम करतात. फळबाग लागवडीमुळे परिसरातील मजुरांना सुध्दा रोजगार मिळत आहे.

Web Title: Chikhaliat Phuletey Amrai near Goregaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.