कारची दुचाकीला धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2019 10:01 PM2019-05-20T22:01:33+5:302019-05-20T22:01:50+5:30

तालुक्यातील मुंडीपार पेट्रोल पंपाजवळ झालेल्या मोटारसायकल व कारच्या अपघातात तीन जन गंभीर जखमी झाले. हा अपघात एवढा भीषण होता की मोटारसायकल शिवशाही बसच्या आत फरफटत गेली तर कारचा चेंदामेंदा झाला. सोमवारी (दि.२०) सायंकाळी ४ वाजतादरम्यान हा अपघात घडला.

Car bicycle hit | कारची दुचाकीला धडक

कारची दुचाकीला धडक

googlenewsNext
ठळक मुद्देमुंडीपार पेट्रोल पंपाजवळ अपघात : दुचाकी शिवशाही खाली फसली

लोकमत न्यूज नेटवर्क
गोरेगाव : तालुक्यातील मुंडीपार पेट्रोल पंपाजवळ झालेल्या मोटारसायकल व कारच्या अपघातात तीन जन गंभीर जखमी झाले. हा अपघात एवढा भीषण होता की मोटारसायकल शिवशाही बसच्या आत फरफटत गेली तर कारचा चेंदामेंदा झाला. सोमवारी (दि.२०) सायंकाळी ४ वाजतादरम्यान हा अपघात घडला.
प्राप्त माहितीनुसार, नागपूरवरुन गोंदियाकडे जाणाऱ्या शिवशाही बसने विरुद्ध दिशेने येणाºया वाहनाला पाहून ब्रेक लावले. शिवशाहीच्या मागोमाग असलेल्या मोटारसायकल क्रमांक एमएच ३५-एसी ९३७२ च्या चालकानेही ब्रेक लावले. पण मोटारसायकलच्या मागे असलेल्या आय- १० कार क्रमांक एमएच ३५- सी ९४२ च्या महिला चालकाने मोटारसायकलला जोरदार धडक दिली. धडक ऐवढी जबरदस्त होती की मोटारसायकल शिवशाहीच्या आत घुसली. तर कारचा चेंदामेंदा झाला. या अपघातातील महिला चालक सालेकसा तालुक्यातील ग्राम साखरीटोला येथील एका खासगी शाळेच्या प्राचार्य असून त्यांचे नाव अजया चुटे आहे.
त्यांच्या कारमध्ये देवांशी चुटे (१०,रा.आमगाव), तेजेश्वरी चुटे (१६,रा.राका) विशाखा दोनोडे (१६,रा.राका) व प्रणाली डोंगरे (१९,रा.राका) होते. तर मोटारसायकल वरील युवकाचे नाव नरेंद्र मेश्राम आहे. अपघातात अजया चुटे, नरेंद्र मेश्राम व कारमधील दोन मुली जखमी झाल्या असून त्यांना ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी नेण्यात आले.

Web Title: Car bicycle hit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.