शौचालयाविना बस धावणार नाही; गोंदिया जिल्ह्यातील हिरापूर आगारप्रमुखाचा निर्धार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2018 01:34 PM2018-08-14T13:34:24+5:302018-08-14T13:34:50+5:30

बसस्थानकावर शौचालय नसल्याने झालेल्या गैरसोयीचा निषेध करण्यासाठी हिरापूर बसस्थानकाच्या आगारप्रमुखाने मंगळवारी सकाळी निघणारी बस रोखून एक वेगळे आंदोलन पुकारले आहे.

The bus will not run without toilets; Determination of the bus stand chief | शौचालयाविना बस धावणार नाही; गोंदिया जिल्ह्यातील हिरापूर आगारप्रमुखाचा निर्धार

शौचालयाविना बस धावणार नाही; गोंदिया जिल्ह्यातील हिरापूर आगारप्रमुखाचा निर्धार

googlenewsNext
ठळक मुद्देशालेय विद्यार्थ्यांना व प्रवाशांना मनस्ताप

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया: बसस्थानकावर शौचालय नसल्याने झालेल्या गैरसोयीचा निषेध करण्यासाठी हिरापूर बसस्थानकाच्या आगारप्रमुखाने मंगळवारी सकाळी निघणारी बस रोखून एक वेगळे आंदोलन पुकारले आहे. गोंदिया ते हिरापूर अशी बसफेरी येथे रात्री पोहचते. रात्रभर मुक्काम करून ही बस पहाटे ६.३० वा. गोंदियाकडे पुन्हा रवाना होते. या बसच्या चालक व वाहकाला निवासाकरिता ग्रामपंचायतीत जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र तेथील शौचालयाला लावलेले कुलूप वारंवार सांगूनही काढण्यात आले नाही. सकाळी या दोन कर्मचाऱ्यांना शौचविधीसाठी उघड्यावर जावे लागत आहे. वारंवार कुलूप काढण्याची मागणी फेटाळली गेल्यामुळे आगारप्रमुखाने मंगळवारी सकाळी बसची फेरी रद्द केली. या निर्णयामुळे जवळपासच्या परिसरातून शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांसह अन्य नागरिकांनाही तिष्ठत रहावे लागले. शौचालयाची व्यवस्था केली जाताच ही बससेवा पूर्ववत केली जाईल असेही आगारप्रमुखांनी स्पष्ट केले आहे.

ग्रामपंचायतीत असलेली शौचालयाची व्यवस्था ही चालक व वाहकांसाठी नाही. त्यांच्यासाठी १५ दिवसात व्यवस्था केली जाईल व बससेवा नियमित करण्याचा प्रयत्न केला जाईल.
बबलू गौतम, उपसरपंच, हिरापूर.

Web Title: The bus will not run without toilets; Determination of the bus stand chief

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.