समाजाच्या विकासासाठी एकजूट व्हावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2019 11:46 PM2019-02-22T23:46:32+5:302019-02-22T23:47:52+5:30

अखिल भारतीय आदिवासी नगारची समाज विकास समितीच्यावतीने बुधवारी आदिवासी नगारची संस्कृती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. उद्घाटन जिल्हा परिषद अध्यक्ष सीमा मडावी यांच्या हस्ते करण्यात आले.

To be united for the development of society | समाजाच्या विकासासाठी एकजूट व्हावे

समाजाच्या विकासासाठी एकजूट व्हावे

Next
ठळक मुद्देमान्यवरांचा सूर : नगारची समाजाचा संस्कृती महोत्सव उत्साहात

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : अखिल भारतीय आदिवासी नगारची समाज विकास समितीच्यावतीने बुधवारी आदिवासी नगारची संस्कृती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
उद्घाटन जिल्हा परिषद अध्यक्ष सीमा मडावी यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी समितीचे अध्यक्ष शिवप्रसाद बरले होते. प्रमुख पाहुणे म्हणून मधुकर उईके, राजकुमार हिवारे, विजय राठीपीटाने, भूवन बुरले, रूकेश नगारची, रोशन पडवार, विनय नागरे, राजू मिरचुले, कुंजीलाल कुमरे, बसंत सिंहमारे, सुधाकर नगारची, वनवास हिवारे, घनश्याम नगारची, विजय राठीपीटने, रामभरोश अकलगुनिया आदी उपस्थित होते. कार्यक्र माची सुरु वात शिवाजी महाराज, वीर बिरसा मुंडा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व शाहू महाराज यांच्या छायाचित्रासमोर दीप प्रज्वलन करून करण्यात आली. तसेच पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर झालेल्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
याप्रसंगी उपस्थित पाहुण्यांनी, आदिवासी नगारची समाज हा विकासापासून कोसो दूर आहे. या समाजातील मुले-मुले अद्यापही शिक्षणापासून वंचित आहेत.
समाजाने आपल्या समाजाच्या विकासाकरिता एकजुटीने काम करावे, असे मत व्यक्त केले. दरम्यान, विविध सांस्कृतिक कार्यक्र म घेण्यात आले. संचालन राजकुमार हिवारे यांनी केले. आभार भुवन बुरले यांनी मानले.
कार्यक्रमासाठी गुलशन कुमरे, मोनू नगरे, तरु ण सोरले, लल्ला सिंहमारे, सतीश सोरले, रोहित सोरले, रोहित मिरचुले, हिमांशू हिवारे, आशुतोष सिंगमारे, सोनू बुरले, लालू सोरले, रोशन सावतवान, रवी येरके, वामन शिकारे, रामप्रसाद पंधराम, रोशन नैताम, संजय परतेती, हेमा सिंहमारे, शकुंतला कुमरे, निरंजन मिरचुले, लता सोरले, कन्हैयालाल सोरले, निलास राठी, नरेंद्र नागरे, ओमप्रकाश सोरले, अनिल पडवार, सावरलाल सिंगमारे आदींनी सहकार्य केले.

Web Title: To be united for the development of society

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.