बॅडमिंटन हॉल ८ महिन्यांपासून कुलूपबंदच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2019 09:47 PM2019-03-16T21:47:50+5:302019-03-16T21:49:05+5:30

खेळातून तरूणांचा विकास व्हावा या उद्देशातून येथे ६.१४ हेक्टर परिसरात आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकुल उभारण्यात आले. आतापर्यंत २१ कोटी रूपये खर्च करून उभारण्यात आलेल्या क्रीडा संकुलात तब्बल ३ कोटी २० लाख ३० हजार रूपये खर्च करून उभारण्यात आलेल्या बॅडमिंटन हॉलचा (इनडोअर)चा लाभ आतापर्यंत येथील लोकांना घेता आला नाही.

Badminton Hall lockup for 8 months | बॅडमिंटन हॉल ८ महिन्यांपासून कुलूपबंदच

बॅडमिंटन हॉल ८ महिन्यांपासून कुलूपबंदच

Next
ठळक मुद्दे३ कोटी २० लाखांतून बांधणी : जिल्हाधिकाऱ्यांनी सुरू करावे इनडोअर हॉल

नरेश रहिले ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : खेळातून तरूणांचा विकास व्हावा या उद्देशातून येथे ६.१४ हेक्टर परिसरात आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकुल उभारण्यात आले. आतापर्यंत २१ कोटी रूपये खर्च करून उभारण्यात आलेल्या क्रीडा संकुलात तब्बल ३ कोटी २० लाख ३० हजार रूपये खर्च करून उभारण्यात आलेल्या बॅडमिंटन हॉलचा (इनडोअर)चा लाभ आतापर्यंत येथील लोकांना घेता आला नाही. मागील ८ महिन्यापूर्वीच सज्ज असलेला हा हॉल कुलूपबंद आहे.
२ एप्रिल २०१२ पासून जिल्हा क्रीडा संकुलाचे बांधकाम व तेथील विविध हॉलचे बांधकाम करण्यात आले. ६.१४ हेक्टर परिसरात उभारण्यात आलेल्या या क्रीडा संकुलातून अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडूू घडणे अपेक्षीत असल्यामुळे येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकुल उभारण्यात आले. परंतु नियोजनशून्यतेमुळे २१ कोटी खर्च झालेल्या या क्रीडा संकुलाचा लाभ जिल्हावासीयांना मिळत नसल्याची खंत क्रीडा प्रेमी व खेळाडूंकडून व्यक्त केली जात आहे. क्रीडा संकुलात उभारण्यात आलेल्या इनडोअर बॅटमिंटन हॉलचे बांधकाम जुलै महिन्यातच पूर्ण झाले.
या बॅडमिंटन हॉलचे लोकार्पण करण्यासाठी १ आॅगस्ट २०१८ ला बैठक घेण्यात आली. परंतु या बांधकामाचे श्रेय लाटण्याच्या हेतून लोकप्रतिनिधींनी ते लोकार्पण होऊ दिले नाही. त्यांच्या दबावाला पाहून प्रभारी जिल्हा क्रीडा अधिकारी सुभाष गांगरेड्डीवार यांनी बॅडमिंटन हॉलचे लोकार्पण करण्याचा माणसच सोडला. ३ कोटी २० लाख रूपये खर्च करून तयार केलेल्या या बॅडमिंटन हॉलचा उपयोग खेळाडूंना व्हावा म्हणून खेळाडू वारंवार क्रीडा अधिकारी यांच्याकडे येत आहेत. परंतु खेळाडूंच्या त्या मागणीकडे सतत दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे खेळाच्या विकासासाठी शासनाने जिल्ह्यावर खर्च केलेले २१ कोटी रूपये पाण्यात गेले असे म्हणायला हरकत नाही. खेळाडूंच्या विकासासाठी जी साधने उपलब्ध आहेत त्याचा फायदा खेळाडूंना घेण्यासाठी का अडकविले जात आहे हे न समजणारे कोडे आहे.
महिन्याकाठी बुडतो ७० हजारांचा महसूल
जिल्हा क्रीडा संकुलात उभारण्यात आलेले आंतरराष्ट्रीय दर्जाचे बॅडमिंटन हॉलमध्ये चार कोट आहेत. हे चारही कोट सुरू केले की सकाळी ४ तास व सायंकाळी ४ तास असे ८ तास खेळाडूंना खेळण्यासाठी सहज मिळू शकतात. यातून शासनाला उत्पन्न देखील मिळू शकतो. मागील ८ महिन्यांपासून हे बॅडमिंटन हॉल सुरू न केल्यामुळे महिन्याकाठी ७० हजार रूपयांचा महसूल बुडत आहे. ज्या खेळाडूंच्या विकासासाठी ८ महिन्यांपासून तयार केलेले हे हॉल बंद असल्यामुळे आतापर्यंत सुमारे ५ लाख ६० हजार रूपयांचे उत्पन्न या हॉलपासून मिळू शकले नाही.
जिल्हाधिकाऱ्यांनी खुला करावा इनडोअर हॉल
लोकसभेची आचारसंहिता सुरू असल्याने या हॉलचे लोकार्पण लोकप्रतिनिधींच्या हातून होणार नाहीच. परंतु जिल्हाधिकारी या जिल्हा क्रीडा संकुल समितीच्या अध्यक्ष असल्यामुळे त्या हॉलला खेळाडूंसाठी खुले करू शकतात. त्यांनी खेळाडूंच्या मागणीला पाहून बॅडमिंटन हॉल खुले करण्याची मागणी होत आहे.
क्रीडा संकुलात अशा हव्यात सुविधा
जिल्हा क्रीडा संकुलात पॅव्हेलियन बिल्डींग, फुटबॉल ग्राऊंड, ४०० मीटर धावनपथ, जलतरण तलाव, इनडोअर हॉल, वसतीगृह, क्रीडा साहित्य, पाणी पुरवठा, ड्रेनेज व्यवस्था, विद्युतीकरण, अंतर्गत रस्ते, संरक्षक भिंत, डायनिंग हॉल, किचन, लॉबी, क्रिकेट ग्राऊंड अशी सोय असावी. या दृष्टीने उपाययोजना करण्यात आल्या. परंतु उभारणी झाल्यानंतरही ज्या खेळाडूंसाठी ही सुविधा आहे त्यांनाच याचा लाभ दिला जात नाही. वसतीगृहाचे काम अपूर्ण आहे तेही लवकरच होत आहे.

Web Title: Badminton Hall lockup for 8 months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :BadmintonBadminton