अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे आमदारांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 09:45 PM2018-03-19T21:45:00+5:302018-03-19T21:45:00+5:30

महाराष्ट्र राज्य अंगणवाडी-बालवाडी कर्मचारी युनियनद्वारे (आयटक) अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांना घेवून आमदार विजय रहांगडाले यांना निवेदन देण्यात आले.

Appeal to the employees of Anganwadi workers | अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे आमदारांना निवेदन

अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे आमदारांना निवेदन

Next

आॅनलाईन लोकमत
तिरोडा : महाराष्ट्र राज्य अंगणवाडी-बालवाडी कर्मचारी युनियनद्वारे (आयटक) अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांना घेवून आमदार विजय रहांगडाले यांना निवेदन देण्यात आले.
अंगणवाडी सेविका व मदतनिसांच्या सेवानिवृत्तीचे वय ६५ वरून ६० वर्षे करण्याचा जीआर महिला व बाल विकास मंत्रालयाने काढला. तो जीआर रद्द करण्यात यावा. सेविका व मदतनिसांना पेंशन लागू नसल्यामुळे ६५ वर्षांची सेवा लागू करण्यात यावी.
जिल्ह्यातील १०० सेवानिवृत्त सेविका व मदतनिस यांना जिल्हा परिषदेने पेंशनचे एकमुस्त अनुक्रमे एक लाख व ७५ हजार रूपये देण्याची कार्यवाही करावी. सेविका व मदतनिसांना पेंशन लागू करण्यात यावे व संप करण्यास मनाई करणारा जीआर परत घ्यावा, अशी मागणी आ. विजय रहांगडाले यांना करण्यात आली.
निवेदन देताना कार्याध्यक्ष हौसलाल रहांगडाले, जिल्हाध्यक्ष शकुंतला फटींग, जीवनकला वैद्य, ब्रिजुला तिडके, दुर्गा संतापे, भुमेश्वरी रहांगडाले, भुमेश्वरी हरिणखेडे, वंदना पटले, प्रेमलता गेडाम, अनिता लिचडे, खेमवता दखने, कुंदलता रहांगडाले, प्रमिला नेवारे, कविता पारधी, इसुकला रहांगडाले उपस्थित होत्या.

Web Title: Appeal to the employees of Anganwadi workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.