अजितदादा धावले अपघातग्रस्तांच्या मदतीला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2018 07:37 PM2018-05-24T19:37:00+5:302018-05-24T19:37:00+5:30

भरधाव इंडिका कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका नादुरूस्त ट्रकला धडक दिली. यात कारमधील तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना गुरूवारी (दि.२४) सायंकाळी ५.४५ वाजताच्या सुमारास गोंदिया-भंडारा मार्गावरील संराडी गावाजवळ घडली. दरम्यान याच मार्गाने तिरोडा येथे प्रचारसभेकरीता जात असलेले राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मंत्री अनिल देशमुख यांनी आपला ताफा थांबवून अपघातग्रस्तांच्या मदतीला धावून गेले.

Ajitdada rushed to help the victims of the accident | अजितदादा धावले अपघातग्रस्तांच्या मदतीला

अजितदादा धावले अपघातग्रस्तांच्या मदतीला

Next

 गोंदिया - भरधाव इंडिका कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका नादुरूस्त ट्रकला धडक दिली. यात कारमधील तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना गुरूवारी (दि.२४) सायंकाळी ५.४५ वाजताच्या सुमारास गोंदिया-भंडारा मार्गावरील संराडी गावाजवळ घडली. दरम्यान याच मार्गाने तिरोडा येथे प्रचारसभेकरीता जात असलेले राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मंत्री अनिल देशमुख यांनी आपला ताफा थांबवून अपघातग्रस्तांच्या मदतीला धावून गेले. तसेच जखमींना कारमधून बाहेर काढून त्यांना आपल्या ताफ्यातील वाहनाने त्वरीत जखमींना तिरोडा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तिरोडा येथील कार्यकर्त्यांना फोन करुन जखमींवर वेळीच उपचार व्हावा, याची काळजी घेण्यास सांगितले. अपघातातील तिन्ही जखमींवर तिरोडा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे. 
प्राप्त माहितीनुसार भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, रि.पा., रिपाईच्या अधिकृत उमेदवाराच्या निवडणूक प्रचारार्थ गुरूवारी सायंकाळी ५ वाजता तिरोडा येथे आयोजित सभेकरीता माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मंत्री अनिल देशमुख यांच्यासह अन्य पदाधिकारी नागपूरवरुन वाहनाने तिरोडा जात होते. दरम्यान तिरोड्यापासून ५ कि.मी.अंतरावर असलेल्या सरांडी गावाजवळ एका इंडिका वाहनाने रस्ताच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला धडक दिली. यात इंडिका कारमधील तीन जण गंभीर झाले. हा अपघात अजित पवार यांच्यासमोर झाला. त्यांनी लगेच वाहन चालकाला गाडी थांबविण्यास सांगितले. त्यानंतर क्षणाचाही विलंब न करता ते गाडीतून उतरुन अपघातग्रस्तांच्या मदतीला धावले. पवार व देशमुख यांनी स्वत: इंडिका वाहनातील जखमींना बाहेर काढले. त्यांच्याच ताफ्यातील एका वाहनाने सर्व जखमींना तातडीने तिरोडा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. ज्या तळमळीने पवार हे अपघातग्रस्तांच्या मदतीला धावून गेले. त्यावरुन त्यांच्यातील मदतीला धावून जाणाºया माणसाचे दर्शन सुध्दा या मार्गावरुन जात असलेल्या वाहनचालक व गावकºयांना घडले. दरम्यान वृत्त लिहीपर्यंत जखमींची नाव कळू शकली नाही. तिरोडा पोलीस स्टेशनचे ठाणेदार संदीप कोळी हे घटनास्थळी रवाना झाले होते.

Web Title: Ajitdada rushed to help the victims of the accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.