ठळक मुद्देआपत्तीग्रस्तांना लवकरच मदत : गोपालदास अग्रवाल यांची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : गोंदिया तालुक्यातील विविध समस्यांच्या निराकरणासाठी आ. गोपालदास अग्रवाल यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष बैठक घेतली. या बैठकीत जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर व तालुका भूमी अभिलेख निरीक्षक उपस्थित होते.
या वेळी जिल्हाधिकारी म्हणाले यंदा ५० टक्के पाऊस कमी पडल्यामुळे जिल्ह्यातील सर्व तालुक्यांसाठी उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. या वेळी आ. अग्रवाल यांनी चक्रीवादळातील आपत्तीग्रस्तांना मोबदला देण्यात आला नाही. कागदावर मंजुरी देण्यात आली. दुष्काळाची परिस्थिती असताना शेतकºयांसोबत सहानुभूती नाही. आपत्तीग्रस्तांना लवकरच सानुग्रह मदत देण्यात यावी, असे सांगितले. तसेच दोनचार दिवसांत आपत्तीग्रस्तांसाठी मदत निधी दिला जाणार असल्याचे सांगितले. तसेच कटंगी, कुडवा, मुर्री, पिंडकेपार, फुलचूर व फुलचूरटोला येथील पुनर्मोजणी संदर्भात माहिती घेतली.
नवेगाव येथे सातबारावर मोठ्या प्रमाणात घोळ असल्यामुळे चर्चा करण्यात आली. अशा गावांचा पुनर्मोजणीचा प्रस्ताव शासनाला पाठविण्यात आला असल्याचे सांगितले. अदासी येथील नाथजोग्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी आवास योजना मागील बैठकीत मंजूर करण्यात आली. त्या मंजुरीला शासन स्तरावर पाठविण्याची विनंती जिल्हाधिकाºयांना करण्यात आली.