चार वाहनांसह गौण खनिज शासन जमा करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2019 12:40 AM2019-01-17T00:40:56+5:302019-01-17T00:42:15+5:30

अवैध गौण खनिज वाहून नेणाऱ्या चार टिप्परला गोंदिया तहसीलदारांनी २४ डिसेंबरला पकडले होते. त्या अवैध खनिज वाहून नेणाºया प्रकरणावर बुधवारी सुनावणी करताना या चार वाहनांवर १८ लाख २४ हजार ५०० रुपयांचा मुद्दे माल शासन जमा करण्याचे आदेश तहसीलदार राहूल सारंग यांनी पीव्हीआर कंपनीला दिले आहे.

Add minor minerals to four vehicles | चार वाहनांसह गौण खनिज शासन जमा करा

चार वाहनांसह गौण खनिज शासन जमा करा

Next
ठळक मुद्देतहसीलदारांचे आदेश : अवैध वाहतुकीला चाप, कठोर कारवाईचे संकेत

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : अवैध गौण खनिज वाहून नेणाऱ्या चार टिप्परला गोंदिया तहसीलदारांनी २४ डिसेंबरला पकडले होते. त्या अवैध खनिज वाहून नेणाऱ्या प्रकरणावर बुधवारी सुनावणी करताना या चार वाहनांवर १८ लाख २४ हजार ५०० रुपयांचा मुद्दे माल शासन जमा करण्याचे आदेश तहसीलदार राहूल सारंग यांनी पीव्हीआर कंपनीला दिले आहे.
पीव्हीआर कंपनी ७०२, सत्यम अंपार्टमेंट बिग बाजारजवळ धंतोली नागपूर यांच्या मालकीचा टिप्पर एमएच ४०-डी १६८ या वाहनाला चालक वासुदेव शालिकराम अहाके रा. सितेकसा ता. तुमसर जि. भंडारा हा ५ ब्रॉस मुरुम टाकून २४ डिसेंबरला वाहतूक करीत असताना नायब तहसीलदार आर.आर.मलेवार यांनी पकडले.
अवैधरीत्या मुरुमाकरिता २२ हजार ५०० रुपये,स्वामीत्व धन २ हजार रुपये व २ लाख रुपये टिप्परची किंमत असा एकूण २ लाख २४ हजार ५०० रुपये शासन जमा करण्याचे आदेश देण्यात आले. याच कंपनीचा एमएच ३१- एफसी २७८४ हा टिप्पर अजय परतेती रा.सुरबोडी ता. पवनी जि.नागपूर हा चालवित होता. त्याच्या टिप्परमध्ये विना परवाना ५ ब्रॉस मुरुम आढळले.
त्याच्यावर टिप्परची किंमत २ लाख रुपये, ५ ब्रॉस मुरुमकरिता २२ हजार ५०० रुपये, स्वामीत्व धन २ हजार रुपये असा एकूण २ लाख २४ हजार ५०० रुपये, याच कंपनीचे टिप्पर एमएच ३१- एफसी २७७९ मध्ये अभिजीत मनोज कोवे रा.सुरबोडी ता.पवनी जि.नागपूर यांनी अवैधरित्या ५ ब्रॉस मुरुम टाकून वाहतूक करीत असताना नायब तहसीलदार मलेवार यांनी पकडले होते. त्या टिप्परची किंमत २ लाख रुपये, मुरुमची किंमत २२ हजार ५०० रुपये स्वामीत्व धन २ हजार रुपये असा एकूण २ लाख २४ हजार ५०० रुपये तसेच याच कंपनीचे पोकलँड पी.सी.२०१ एल.सी. या वाहनाला अतुल धनराज कुरजेकर रा. चिखली ता.पवनी जि. भंडारा हा चालवित होता.विना परवाना त्याने १०० ब्रॉस मुरुम उत्खनन केल्यामुळे ते वाहन जप्त करण्यात आले होते.
पोकलँडची किंमत ७ लाख ५० हजार, १०० ब्रॉस मुरुमाची किंमत ४ लाख ५० हजार, स्वामीत्व धन ४० हजार असा १८ लाखाचा माल शासन जमा करण्याचे आदेश तहसीलदार राहूल सारंग यांनी दिले आहे.

Web Title: Add minor minerals to four vehicles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.