पहिल्याच दिवशी शंभर वाहन चालकांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2018 09:51 PM2018-10-22T21:51:28+5:302018-10-22T21:53:15+5:30

जिल्ह्यात सोमवार (दि.२२) पासून हेल्मेट सक्ती करण्यात आली. यापूर्वी वाहन चालकांना १० दिवसाची मुभा देण्यात आली होती. मात्र यानंतरही हेल्मेट खरेदी न करता वाहन चालविणाऱ्या वाहन चालकांना दंड करण्याची मोहीम वाहतूक पोलीस शाखेतर्फे राबविण्यात आली.

Action on hundred drivers on the first day | पहिल्याच दिवशी शंभर वाहन चालकांवर कारवाई

पहिल्याच दिवशी शंभर वाहन चालकांवर कारवाई

Next
ठळक मुद्देहेल्मेट सक्ती : वाहतूक विभागाची मोहीम, वाहन चालकात खळबळ

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यात सोमवार (दि.२२) पासून हेल्मेट सक्ती करण्यात आली. यापूर्वी वाहन चालकांना १० दिवसाची मुभा देण्यात आली होती. मात्र यानंतरही हेल्मेट खरेदी न करता वाहन चालविणाऱ्या वाहन चालकांना दंड करण्याची मोहीम वाहतूक पोलीस शाखेतर्फे राबविण्यात आली.
हेल्मेटचा वापर न करणाऱ्या वाहन चालकांना ५०० रूपये दंड करण्यात आला. मोहीमेच्या पहिल्याच दिवशी १०० लोकांकडून ५०० प्रमाणे ५० हजार रूपये दंड वसूल करण्यात आला. दरम्यान वाहतूक नियंत्रण विभागाच्या धडक कारवाईमुळे वाहन चालकांचे धाबे दणाणले आहे. जिल्ह्यात दरवर्षी १५० व्यक्ती रस्ता अपघातात मृत्यू पावतात. त्यापैकी सरासरी १०० व्यक्ती मोटारसायकल चालक असतात.
रस्ता अपघातात डोक्याला मार लागल्याने गंभीर दुखापत होते. जखमी व्यक्ती अवकाळी मृत्यू पावतात. वाहन चालक प्राणास मुकू नये, यासाठी मोटारसायकल चालकांना हेल्मेट वापरणे सक्तीचे करण्यात आले आहे. गोंदिया जिल्हा पोलीस दलातील पोलिसांनी हेल्मेट न वापरल्यामुळे १५ पोलिसांना यापूर्वी दंड केला होता.
सामान्य नागरिक वाहन चालवितांना हेल्मेट वापरावेत म्हणून त्यांच्यासाठी देखील हेल्मेट सक्ती करण्यात आली. वाहन चालवितांना हेल्मेट न वापरलेल्या १२५ ते १५० लोकांना हेल्मेट घेण्याचा सल्ला पोलिसांनी दिला. पोलिसांच्या सल्ल्यावरुन त्या वाहन चालकांनी वाहतूक पोलिसांच्या समोरच हेल्मेट खरेदी केले.
अपघातात व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबातील पत्नी, मुले, वडील, आई यांच्यावर आर्थिक, शारीरीक व मानसिक संकट उदभवते. दरवर्षी रस्ता अपघातात सामान्य जनतेसह गोंदिया जिल्ह्यातील पोलीस कर्मचारी मृत्यू पावतात. अपघातात मृत्यू पावणाऱ्यांमध्ये जास्तीत जास्त दुचाकी चालक असतात. त्यामुळे मृतांच्या कुटुंबावर संकट कोसळते.
या सर्व प्रकारच्या परिस्थीतीवर लक्ष वेधून हेल्मेट वापरण्याची सक्ती करण्यात आली आहे.ज्यांनी वाहन चालवितांना हेल्मेटचा वापर केलेला नाही, अश्या लोकांवर मोटार वाहन कायदा कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
गोंदिया जिल्ह्यातील पोलीस कर्मचाऱ्यांना हेल्मेटची सवय लागावी यासंदर्भात सोमवारी विशेष मोहीम राबविण्यात आली. यात गोंदिया शहरात राबविलेल्या मोहीमेत १०० वाहन चालकांना मोटार वाहन काद्यान्वये प्रत्येक व्यक्तीवर ५०० रूपये प्रमाणे ५० हजार रूपये तडजोड शुल्क त्यांच्याकडून वसूलकरण्यात आले.
एकावर गुन्हा दाखल
हेल्मेट सक्तीचे झाल्याने वाहतूक पोलीस वाहन चालकांना हेल्मेट न वापरल्यास दंड करण्यासाठी थांबवित असताना फुलचूर येथील टी पार्इंटवर सोमवारी (दि.२२) दुपारी १ वाजता वाहन क्र. एमएच ३५ ए.एस. ८२५४ चा चालक दुर्योधन दयाराम भोयर (३४) व दुशासन दयाराम भोयर (२८) रा. कनेरी ता. सडक-अर्जुनी हे दोन्ही भावंडांनी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांशी वाद घातला. पोलिसांना मारण्यास धावल्याने त्या दोघांविरूध्द गोंदिया ग्रामीण पोलिसात भादंविच्या कलम ३५३, ३५४, ५०४, ५०९, २९४ सहकलम १३०, १२९, १७७ मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.

मोटारसायकल चालकांनी व मागे बसणाऱ्या व्यक्तींनी सुरक्षेच्या दृष्टीकोणातून हेल्मेट वापरावेत. हेल्मेट न वापरणाऱ्यांवर मोटार वाहन कायद्यान्वये कारवाई करण्यात येईल.
-संजय सिंह, सहायक पोलीस निरीक्षक वाहतूक शाखा गोंदिया.

Web Title: Action on hundred drivers on the first day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.