३२ हजार शौचालय स्वयंस्फूर्तीने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 11:11 PM2018-04-24T23:11:35+5:302018-04-24T23:11:35+5:30

स्वच्छ भारत मिशन अंतर्गत जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाने केलेल्या जनजागृतीमुळे गोंदिया जिल्ह्यातील ३२ हजार २३८ कुटुंबानी २० एप्रिल पर्यंत कवडीची शासकीय मदत न घेता स्वयंस्फूर्तीने शौचालय उभारले आहे.

32 thousand toilets spontaneously | ३२ हजार शौचालय स्वयंस्फूर्तीने

३२ हजार शौचालय स्वयंस्फूर्तीने

googlenewsNext
ठळक मुद्देघर तेथे शौचालय : जिल्ह्यातील गरीब कुटुंबांनी घेतला पुढाकार

नरेश रहिले।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : स्वच्छ भारत मिशन अंतर्गत जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाने केलेल्या जनजागृतीमुळे गोंदिया जिल्ह्यातील ३२ हजार २३८ कुटुंबानी २० एप्रिल पर्यंत कवडीची शासकीय मदत न घेता स्वयंस्फूर्तीने शौचालय उभारले आहे. शौचालय बांधण्यासाठी त्यांनी आपल्या मिळकतीतून पैसे वाचवून घरातील कुणीही व्यक्ती उघड्यावर शौचास जाणार नाही असा संकल्प केला.
जिल्हा निर्मल करण्याच्या नादात अनेक शौचालय कागदावर दाखविण्यात आले होते. तर काही शौचालयाचे काम निकृष्ट दर्जाचे करण्यात आले होते. गोंदिया जिल्हा पाच- सात वर्षापूर्वीच ओडीएफ झाला होता.
परंतु ६७ हजार ७३८ कुटुंबाकडे शौचालय नव्हते. या कुटुंबामध्ये जिल्हा परिषदेने शौचालयासंदर्भात जनजागृती केली. शासकीय मदत न घेता शौचालय बांधकाम करण्यासाठी ३२ हजार २३८ कुटुंबे पुढे आली आहेत.
उर्वरीत असलेल्या १२ हजार १६२ कुटुंबानी शासकीय अनुदानाशिवाय शौचालय तयार करावे यासाठी जिल्हा परिषदेचे प्रयत्न सुरू आहेत. यात तिरोडा २९९, सालेकसा ८५९, सडक-अर्जुनी १ हजार ६३८, गोरेगाव ९६४, गोंदिया ३ हजार ६८६, देवरी १ हजार २८०, अर्जुनी-मोरगाव एक हजार ९०६ व आमगाव १ हजार ५३० शौचालयांचा समावेश आहे.
मध्यप्रदेश व छत्तीसगड राज्याच्या सिमेला लागून असलेल्या गोंदिया जिल्ह्याची कुटुंबसंख्या सर्वेक्षणानुसार २ लाख १७ हजार १५३ आहे.
ज्या कुटुंबाकडे शौचालय नव्हते त्या कुटुंबानी जिल्हा परिषदेने राबविलेल्या ‘घर तेथे शौचालय’ या उपक्रमााचा लाभ घेतला. या अभियानांतर्गत जिल्हा ओडीएफ झाल्यानंतर प्लस होत आहे.
जनजागृतीमुळे लोकांचे मनपरिवर्तन
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश राठोड यांच्या मार्गदर्शनात शौचालयाचे महत्व समजाविण्यासाठी व्यापक अभियान चालविण्यात आले. यामुळे जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्राम पंचायतचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी गावागावात जाऊन जनजागृती केली. घराघरात शौचालय बांधण्यास लोकांना प्रवृत्त केले.
तिरोड्यातील ९४.११ टक्के शौचालय मदतीविना
शासकीय अनुदान न घेता जिल्ह्यात ४५ हजार ४०० शौचालय तयार करण्याचे उद्दीष्टे ठेवण्यात आले होते. यात तिरोडा तालुक्याने ५ हजार ७७ शौचालय तयार करण्याचे उद्दीष्टे ठेवले होते. यात ४ हजार ७७४ (९४.११ टक्के) शौचालय तयार करण्यात आले. यानंतर सालेकसात ४ हजार ६७७ पैकी ३ हजार ८१८ ( ८१.६३ टक्के), गोेरेगाव ४ हजार ७७४ पैकी ३ हजार ८१० (७९.८१ टक्के), सडक-अर्जुनी ६ हजार ७४८ पैकी ५ हजार ११० (७५.७३ टक्के), अर्जुनी -मोरगाव ६ हजार ६८१ पैकी ४ हजार ७७५ (७१.४७ टक्के) देवरी ३ हजार ९३० पैकी २ हजार ६५० (६७.४३ टक्के), गोंदिया ९ हजार ६१२ पैकी ५ हजार ९२६ (६१.६५ टक्के) तर आमगाव सर्वात कमी ३ जार ९०१ पैकी २ हजार ३७१ (६०.७८ टक्के) शौचालय तयार करण्यात आले.

जिल्हा ओडीएफ नंतर ओडीएफ प्लस करण्याचे प्रयत्न सुरू आहे. शौचालयासाठी घरोघरी जाऊन प्रोत्साहित केले जात आहे. त्यांना मार्गदर्शन केले जात आहे. त्यामुळेच शासकीय अनुदानााविनाही लोक स्वयंस्फूतीने शौचालय तयार करीत आहेत.
राजेश राठोड
उपमुख्य कार्यकारी अधिकारी
पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग जि.प.गोंदिया.

Web Title: 32 thousand toilets spontaneously

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.