जिल्ह्यात आरोग्य कर्मचाऱ्यांची ३०१ पदे रिक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2018 01:12 AM2018-06-21T01:12:02+5:302018-06-21T01:12:02+5:30

नागरिकांचे आरोग्य अबाधित रहावे यासाठी शासन वर्षाकाठी कोट्यवधी रुपये खर्च करीत असतो. त्यातच मंजूर निधीतून भौतिक तसेच आवश्यक सोयी सुविधांवर भर देत आहे. त्यामुळे शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

301 posts of health workers in the district vacant | जिल्ह्यात आरोग्य कर्मचाऱ्यांची ३०१ पदे रिक्त

जिल्ह्यात आरोग्य कर्मचाऱ्यांची ३०१ पदे रिक्त

Next
ठळक मुद्देआरोग्य सेवा प्रभावित : सुरळीत सेवेसाठी वर्ग-३ व वर्ग-४ ची पदे भरण्याची गरज

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : नागरिकांचे आरोग्य अबाधित रहावे यासाठी शासन वर्षाकाठी कोट्यवधी रुपये खर्च करीत असतो. त्यातच मंजूर निधीतून भौतिक तसेच आवश्यक सोयी सुविधांवर भर देत आहे. त्यामुळे शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
जिल्हा सामान्य रूग्णालयासह अधिनस्त एकूण १३ रुग्णालयांत आरोग्य कर्मचारी वर्ग -३ व वर्ग ४ ची ७८८ पदे मंजूर आहेत. मात्र जिल्ह्यात ७८८ पदांपैकी ३०१ पदे रिक्त पडून आहेत. त्यामुळे याचा परिणाम जिल्ह्यातील आरोग्य सेवेवर पडत आहे.
शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्य सेवा पुरविण्यावर शासनाचा भर आहे. त्यानुरुप जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात ग्रामीण रुग्णालय व जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हा सामान्य रुग्णालयाची निर्मिती करण्यात आली आहे. त्यानुरुप रुग्णालयाच्या ठिकाणी आरोग्य अधिकाºयांसह आरोग्य कर्मचाºयांची नियुक्ती केली जाते.
जिल्ह्यात सामान्य रुग्णालयासह जिल्हा क्षयरोग केंद्र, बाई गंगाबाई महिला रुग्णालय, तिरोडा येथे उपजिल्हा रुग्णालय व इतर १० ठिकाणी ग्रामीण रुग्णालयांची निर्मिती करण्यात आली आहे. या रुग्णालयामध्ये आरोग्य कर्मचारी वर्ग ३ ची ५०५ पदे मंजूर असून १८१ पदे रिक्त पडून आहेत. त्याचप्रमाणे वर्ग ४ च्या २८३ पदांपैकी १२० पदे रिक्त आहेत.
यामध्ये जिल्हा सामान्य रुग्णालयात वर्ग ३ ची २०२ पदे मंजूर असून १०६ पदे भरलेली आहेत, तर ९६ पदे रिक्त आहेत. वर्ग ४ ची १३५ पदे मंजूर असून ६२ पदे भरलेली आहेत. तर ७३ पदे रिक्त आहेत. जिल्हा क्षयरोग केंद्रात वर्ग ३ ची १६ मंजूर पदे असून १ पद रिक्त आहे. तर वर्ग ४ ची १३ पदे मंजूर असून ४ पदे रिक्त आहेत. बाई गंगाबाई रुग्णालयात वर्ग ३ ची ११२ पदे मंज़ूर असून ४१ पदे रिक्त, वर्ग ४ ची ५३ पदे मंजूर असून २० पदे रिक्त आहेत. तिरोडा उपजिल्हा रुग्णालयात २५ पदे मंजूर असून ५ पदे रिक्त पडून आहेत. त्याचप्रमाणे वर्ग ४ ची ७ पदे मंजूर असून १ पद रिक्त आहे. ग्रामीेण रुग्णालय देवरी येथे वर्ग ३ ची १५ पदे मंजूर असून २ पदे रिक्त आहेत. ग्रामीण रुग्णालय चिचगड येथे वर्ग ३ ची १५ पदे मंजूर असून ६ पदे रिक्त, वर्ग ४ ची ७ पदे मंजूर असून ४ पदे रिक्त आहेत. ग्रामीण रुग्णालय अर्जुनी मोरगाव येथे वर्ग ३ च्या १५ पदांपैकी ४ पदे तर वर्ग ४ च्या ७ पदांपैकी १ पद रिक्त आहेत. ग्रामीण रुग्णालय नवेगाव येथे वर्ग ३ ची १५ पदे मंजूर असून ४ पदे रिक्त आहे. तर वर्ग ४ ची ७ पदे मंजूर असून २ पदे रिक्त आहेत. ग्रामीण रुग्णालय सडक अर्जुनी येथे वर्ग ३ ची १५ पदे मंजूर असून २ पदे तर वर्ग ४ ची ७ पदे मंज़ूर असून २ पदे रिक्त आहेत. ग्रामीण रुग्णालय सालेकसा येथे १५ पदे मंजूर असून १ पद रिक्त आहे. त्याचप्रमाणे वर्ग ४ च्या ७ पदांपैकी २ पदे रिक्त आहेत. ग्रामीण रुग्णालय आमगाव येथे वर्ग ३ची १५ पदे मंजूर असून ४ पदे रिक्त आहेत. वर्ग ४ ची ७ पदे मंजूर असून १ पद रिक्त आहे. ग्रामीण रुग्णालय गोरेगाव येथे वर्ग ३ ची १५ पदे मंजूर असून ३ पदे रिक्त आहेत. रजेगाव ग्रामीण रुग्णालयात वर्ग ३ ची १५ पदे मंजूर असून ५ पदे रिक्त आहेत. तर वर्ग ४ ची ७ पदे मंज़ूर असून ३ पदे रिक्त आहेत. त्याचप्रमाणे ग्रामीण रुग्णालय सौंदड येथे वर्ग ३ ची १५ पदे मंजूर असून ७ पदे तर वर्ग ४ च्या ७ मंजूर पदांपैकी २ पदे रिक्त पडून आहेत.
एकंदरीत आरोग्य कर्मचाऱ्यांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त असल्याने दूरदूरच्या ठिकाणाहून येणाऱ्या रुग्णांना आरोग्य सेवेचा फायदा मिळत नसल्याचे दिसून येत आहे.

Web Title: 301 posts of health workers in the district vacant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.