नोकराने केली ३ लाख ३२ हजारांनी फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2019 11:40 PM2019-07-19T23:40:51+5:302019-07-19T23:41:52+5:30

शहरातील अनुपचंद त्रिलोकचंद ज्वेलर्समध्ये २७ दिवसांपासून काम करणाऱ्या नोकराने मालकाला ३ लाख ३२ हजार रुपयांनी गंडविले.यासंदर्भात गोंदिया शहर पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. क्रिष्णा उमेशप्रसाद सोनी रा.बाबुराव इटनकर वॉर्ड गडचांदूर, जिल्हा चंद्रपूर असे आरोपी नोकराचे नाव आहे.

3 lakh 32 thousand deceased cheating | नोकराने केली ३ लाख ३२ हजारांनी फसवणूक

नोकराने केली ३ लाख ३२ हजारांनी फसवणूक

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : शहरातील अनुपचंद त्रिलोकचंद ज्वेलर्समध्ये २७ दिवसांपासून काम करणाऱ्या नोकराने मालकाला ३ लाख ३२ हजार रुपयांनी गंडविले.यासंदर्भात गोंदिया शहर पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. क्रिष्णा उमेशप्रसाद सोनी रा.बाबुराव इटनकर वॉर्ड गडचांदूर, जिल्हा चंद्रपूर असे आरोपी नोकराचे नाव आहे.
अनुपचंद त्रिलोकचंद ज्वेलर्सचे मालक पंकज धनराज चोपडा (४०) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार शहराच्या गांधी प्रतिमाजवळ अनुपचंद त्रिलोकचंद ज्वेलर्स मागील ५ वर्षापासून सुरु आहे. यात ११ कर्मचारी कामावर आहेत. क्रिष्णा शर्मा २७ दिवसांपासून तो कामावर होता आणि मालकाच्या घरी खालच्या खोलीमध्ये राहत होता.
दुकानातील सोन्या-चांदीचे दागिणे दुरुस्तीकरिता राजू सामता, सोनार चाळ, प्रभूरोड गोंदिया यांच्याकडे दिवसातून अनेकदा नोकराच्या हातून पाठविले जात होते. १८ जुलै रोजी सदर दागिणे दुरुस्तीकरिता राजू सामता यांच्याकडे रात्री ८ वाजता पाठविले. मालकाची मोटरसायकल घेऊन गेलेला क्रिष्णा रात्री ९.३० पर्यंत परत आला नाही. मालकाने फोन लावल्यावर त्याने फोनही उचलला नाही.५७ ग्रॅम वजनाचा सोन्याचा मंगळसूत्र, किमत २ लाख १७ हजार, २४ ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या बांगडया किमत ८६ हजार, ८ ग्रॅम वजनाची एक सोन्याची अंगठी, किमत २९ हजार असा ३ लाख ३२ हजाराचा माल त्याने पळवून नेला.
यासंदर्भात १९ जुलै रोजी गोंदिया शहर पोलिसांत भादंविच्या कलम ४०८, ४२० अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: 3 lakh 32 thousand deceased cheating

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.