१०८ पोलिसांना विशेष सेवा पदक वितरीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2018 09:08 PM2018-12-09T21:08:17+5:302018-12-09T21:17:35+5:30

गोंदिया जिल्ह्यातील नक्षलग्रस्त भागात सतत २ वर्ष उत्कृष्ट सेवा करणाऱ्या १०८ पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र शासनाकडून खडतर सेवेचे पदक देवून सन्मानित करण्यात आले आहे. शुक्रवारी (दि.७) ग्राम कारंजा येथील पोलीस मुख्यालयात हा पदक वितरण सोहळा घेण्यात आला.

108 policemen deliver special services medal | १०८ पोलिसांना विशेष सेवा पदक वितरीत

१०८ पोलिसांना विशेष सेवा पदक वितरीत

Next
ठळक मुद्दे३१ अधिकारी व ७७ पोलीस कर्मचाऱ्यांचा बदलीच्या ठिकाणीच सत्कार

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : गोंदिया जिल्ह्यातील नक्षलग्रस्त भागात सतत २ वर्ष उत्कृष्ट सेवा करणाऱ्या १०८ पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र शासनाकडून खडतर सेवेचे पदक देवून सन्मानित करण्यात आले आहे. शुक्रवारी (दि.७) ग्राम कारंजा येथील पोलीस मुख्यालयात हा पदक वितरण सोहळा घेण्यात आला. विशेष म्हणजे, ज्यांना हे पदक जाहीर झाले आणि त्यांची ज्या ठिकाणी नियुक्ती आहे त्याच ठिकाणी हे पदक देवून सन्मानीत करण्यात आले.
कार्यक्रमाला नागपूर शहरचे सह पोलीस आयुक्त रविंद्र कदम, नक्षल विरोधी अभियान नागपूरचे शरद शेलार, गडचिरोली परीक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक अंकुश शिंदे, गोंदिया जिल्ह्याचे पहिले पोलीस अधिक्षक टी.बी. देवतळे, जिल्हाधिकारी कादंबरी बलकवडे, पोलीस अधीक्षक हरिष बैजल, आमगाव नगर परिषदेचे मुख्याधिकारी मनोज जिंदल, बिरसी विमानतळचे सचिन खंगार, अतिरिक्त पोलीस अधीक्षक संदीप आटोळे उपस्थित होते.
गोंदिया जिल्ह्यात काम करणाऱ्या पोलिसांना त्यांच्या कामाची पावती मिळावी म्हणून गोंदिया पोलिस विभागाने दोन वर्षापूर्वी पोलीस अधिकारी- कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यासाठी पोलिस अधिकारी- कर्मचाऱ्यांची माहिती व प्रस्ताव मुंबई येथील पोलीस महासंचालक कार्यालयाला पाठविला होता. त्यानुसार, शासनाने गोंदिया जिल्ह्यात कार्य करणाऱ्या ३१ अधिकारी व ७७ पोलीस कर्मचाऱ्यांना खडतर सेवेचा पुरस्कार जाहीर केला.
यातील एक सहायक पोलीस निरीक्षक व ५७ पोलीस कर्मचारी सध्या गोंदिया जिल्ह्यात कार्यरत आहेत. तर ५० अधिकारी-कर्मचारी बदलून गेले आहेत. बदली झाल्यानंतर ज्या ठिकाणी ते अधिकारी-कर्मचारी कार्यरत आहेत. त्या ठिकाणी पोलीस परेडमध्ये सदर पदक त्यांना देवून सन्मानीत करण्यात आले. या पदकासाठी गोंदिया जिल्ह्यात सेवा दिलेले सात पोलीस निरीक्षक, ६ सहायक पोलीस निरीक्षक, १८ पोलीस उपनिरीक्षक व ७७ कर्मचारी अशा १०८ लोकांची निवड करण्यात आली. राज्यात गोंदिया व गडचिरोली सोडून काम करणाºया पोलीस अधिकाऱ्यांना या दोन जिल्ह्यात काम करण्याची प्रेरणा मिळावी म्हणृून शासनाने खडतर सेवेचे पदक देण्यात आले आहे.
यांंचा झाला सन्मान
कठीण व खडतर कामगिरी केल्याबद्दल विशेष सेवा पदक गोंदिया जिल्ह्यात सध्या कार्यरत असलेले डुग्गीपार पोलीस ठाण्यात कार्यरत सहायक पोलीस निरीक्षक किशोर पर्वते, दिलीप हातझाडे (बक्कल क्र.१७६६), अशोक टिचकुले (११९०), शितल भांडारकर (२०७५), आशा बोरकर (१६८३), सुषमा कनपुरीया (७७६), काजल पंच (८३३), पुरूषोत्तम देशमुख (१८५४), राजेंद्र चकोले (१८७०), दिलीप बंजार (१७१८), प्रशांत कुरंजेकर (१७३२), प्रकाश मेश्राम (१६०४), अर्जुन सांगळे (१५७६), मनोज केवट (१९२१), गंगाधर केंदे्र (१६३०), श्रीकांत नागपुरे (१९४६), राकेश भुरे (१४२७), रूपेंद्र गौतम (१९३८), शिवलाल उईके (१८८९), प्रसन्ना सुखदेवे (१६८२), नितेश गवई (१७८३), देवेंद्र कोरे (१९४०), चंद्रमणी खोब्रागडे (२४८), सुरेश बावणकर (१५१४), अनिल उके (२००१), बिंदीया कोटांगले (१६६९), गौतम भैसारे (२००३), संतोष चुटे (२०१०), पुरूषोत्तम बोपचे (२१११), कैलाश यादव (९४०), ममता दसरे (१४६७), प्रतापसहा सलामे (८५५), किशोर टेंभूर्णे (७६६), लक्ष्मण गोटे (२०९७), चुळीराम शेंडे (१७४६), शालीकराम दखने (१५९१), बाबुलाल राऊत (२४७), सुरेश कटरे (२११६), ओमप्रकाश जामनिक (१११४), यादोराव कुर्वे (२११०), सुनिल गुट्टे (२१२०), हंसराज अरकासे (१५६०), अमित लांडगे (१३८९), रामेश्वर राऊत (१२४४), आशिष वंजारी (२०६२), ईश्वरदास जनबंधू (१९०२), मनोज चुटे (१५०२), विलास नेरकर (१७११), हितेश बरिये (१४१४), संदीप झिले (५२१), लियोनार्ड मार्र्टींन (२७२), महेंद्र मेश्राम (४०२), घनश्याम उईके (१३९७), सेवक राऊत (१३६२), राजेंद्र बिसेन (१२४६), नितीन रहांगडाले (१११९), योगेश गावंडे (२०८३), अमित नागदेवे (१८९२) यांना पदक देऊन सन्मानीत करण्यात आले आहे.

Web Title: 108 policemen deliver special services medal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस