पंचायतक्षेत्रात कचरा प्रकल्प कशाला? कॉंग्रेस आमदाराचा गोवा विधानसभेत  प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2018 10:17 PM2018-02-22T22:17:46+5:302018-02-22T22:17:57+5:30

गोव्यात दोन मोठे कचरा प्रकल्प होऊ घातले असताना सर्व पंचायती क्षेत्रात वेगळे  प्रकल्प कशाला असा प्रश्न टोनी ऊर्फ आनतोनियो फर्नांडीस यांनी केला. 

Why waste the garbage in Panchayat area? Congress MLA's question in the Goa Legislative Assembly | पंचायतक्षेत्रात कचरा प्रकल्प कशाला? कॉंग्रेस आमदाराचा गोवा विधानसभेत  प्रश्न

पंचायतक्षेत्रात कचरा प्रकल्प कशाला? कॉंग्रेस आमदाराचा गोवा विधानसभेत  प्रश्न

Next

पणजी - गोव्यात दोन मोठे कचरा प्रकल्प होऊ घातले असताना सर्व पंचायती क्षेत्रात वेगळे  प्रकल्प कशाला असा प्रश्न टोनी ऊर्फ आनतोनियो फर्नांडीस यांनी केला. 
हा प्रश्न विचारताना फर्नांडीस यांनी आपल्या सांताक्रूज मतदारसंघाचे उदाहरण देऊन या मतदारसंघात जागाच उपलब्ध नसल्याचे सांगितले. त्यामुळे या निर्णयाचा फेर विचार करण्याची मागणी त्यांनी केली. 
या प्रश्नाला उत्तर देताना पंचायत मंत्री मॉवीन गुदिन्हो म्हणाले की, 'गोव्यात केवळ 55 ठिकाणी कचरा प्रकल्पासाठी जागा पाहिली आहे. याचे कारण जाग्याची अनुपलब्धी आहे. राज्यात दोन मोठे प्रकल्प येत असताना प्रत्येक ग्रामपंचायत क्षेत्रात प्रकल्पासाठी जागा पाहण्यासाठी का सांगण्यात येत आहे हा प्रश्न मला ही होता. परंतु मोठे प्रकल्प सुरू होण्यासाठी  किमान दोन तीन वर्षे तरी जाणार आहेत. तोपऱ्यंत कचरा व्यवस्थापन करण्यासाठी तरी हे पंचायत क्षेत्रात प्रकल्प हवेच आहेत. ''
यावर पंचायतीन कचरा प्रक्रियेसाठी देण्यात येणारा 2 लाख रुपये निधी हा अपुरा असल्याचे सांगितले.  परंतु हा निधी यापूर्वी केवळ 50 हजार होते ते सरकारने आता 2 लाख रुपये केले आहेत हे मॉविन यांनी त्यांच्या नजरेस आणून दिले. फंडाची उपलब्धी व्हावी यासाठी पंचायत खाते प्रयत्न करणार आहे, परंतु ग्रामपंचायती व स्थानिक आमदाराने स्वतः त्यासाठी काम करण्याची आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Why waste the garbage in Panchayat area? Congress MLA's question in the Goa Legislative Assembly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा