दक्षिण गोव्याला दिलासा, साळावली धरणाच्या पाणी पातळीत वाढ 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2019 05:06 PM2019-07-12T17:06:13+5:302019-07-12T17:13:13+5:30

पावसाळा लांबल्यामुळे जून महिन्यात गोव्यातील धरणांची पातळी एकदम खाली गेल्याने काहीशी दुष्काळग्रस्त स्थिती निर्माण झाली होती. मात्र मागच्या दहा दिवसांत पडलेल्या धुवांधार पावसाने ही कसर भरुन काढली आहे.

WATER LEVEL OF GOAN RESERVOIR LEVELS RAISED BY 20% | दक्षिण गोव्याला दिलासा, साळावली धरणाच्या पाणी पातळीत वाढ 

दक्षिण गोव्याला दिलासा, साळावली धरणाच्या पाणी पातळीत वाढ 

Next
ठळक मुद्दे जून महिन्यात गोव्यातील धरणांची पातळी एकदम खाली गेल्याने काहीशी दुष्काळग्रस्त स्थिती निर्माण झाली होती.गोव्यातील धरणातील पाण्याची पातळी सरासरी 20 टक्क्यांपर्यंत वाढली आहे.गोव्यातील सर्वात मोठे धरण असलेल्या साळावली धरणाची पातळी 35.9 मीटरपर्यंत वाढली आहे.

मडगाव - पावसाळा लांबल्यामुळे जून महिन्यात गोव्यातील धरणांची पातळी एकदम खाली गेल्याने काहीशी दुष्काळग्रस्त स्थिती निर्माण झाली होती. मात्र मागच्या दहा दिवसांत पडलेल्या धुवांधार पावसाने ही कसर भरुन काढली आहे. मागच्या दहा दिवसांत पडलेल्या पावसामुळे गोव्यातील धरणातील पाण्याची पातळी सरासरी 20 टक्क्यांपर्यंत वाढली आहे.

गोव्यातील सर्वात मोठे धरण असलेल्या साळावली धरणाची पातळी 35.9 मीटरपर्यंत वाढली आहे. जुलै महिन्याच्या सुरुवातीला या धरणातील पाणी 20 टक्क्यांवर पोहोचले होते ते आता 55 टक्क्यांवर पोहोचले आहे. साळावली धरण हे दक्षिण गोव्यासाठी पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणारा मुख्य स्रोत असून या धरणाच्या भोवती असलेल्या निसर्गामुळे ते एक पर्यटन स्थळही आहे.

दक्षिण गोव्यातील पंचवाडी येथील धरणाची पातळी 61 टक्क्यांपर्यंत पोहोचली असून एकूण पाण्याची पातळी 47.4 मीटर एवढी वाढली आहे. काणकोणातील चापोली धरण 53 टक्के भरले असून पाण्याची पातळी 32.8 मीटर एवढी वाढली आहे. पंचवाडी धरणातून फोंड्याला तर चापोली धरणातून काणकोणला पाणी पुरवठा केला जातो.

मागच्या दहा दिवसांत गोव्यात मुसळधार पाऊस पडत असून त्यामुळे प्रत्येक धरणाची पातळी सरासरी 20 टक्क्यांनी वाढली आहे. यंदा पावसाळा उशिरा आल्याने जुन महिन्यात ही पातळी  6 ते 18 टक्क्यांवर पोहोचली होती. बार्देश तालुक्याला पाणी पुरवठा करणारे आमठाणो धरण 65 टक्के भरले असून पाण्याची पातळी 47.4 मीटरवर पोहोचली आहे. सत्तरी, डिचोली व बार्देश या तालुक्यांना पाणी पुरवठा करणाऱ्या अंजुणे धरण 28 टक्के भरले असून जुन महिन्यात या धरणाच्या पाण्याची पातळी 6 टक्क्यांवर पोहोचली होती.

झाडे पडण्याच्या 300 घटना

मुसळधार पावसामुळे मागच्या दहा दिवसात राज्यात झाडे पडण्याच्या 300 घटना घडल्या असून यापैकी काही झाडे घरावर व वीजेच्या खांबावर कोसळल्याने कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. झाडे उन्मळून पडण्याच्या जास्त घटना काणकोण, सांगे, वाळपई व सत्तरी या भागात घडल्या आहेत.

 

Web Title: WATER LEVEL OF GOAN RESERVOIR LEVELS RAISED BY 20%

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.