डब्ल्यु हॉटेलच्या १५ कुटिरांचे परवाने रद्द

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2018 10:14 PM2018-10-17T22:14:41+5:302018-10-17T22:14:57+5:30

डब्ल्यु हॉेलची वागातोर येथील १५  कुटीरांचा परवाना गोवा किनारा नियमन (सीझेडएमए) विभागाकडून मागे घेण्यात आला आहे. त्यामुळे ही कुटिरे पाडावी लागणार आहेत. खंडपीठाने याचिका निकालात काढली.  ​​​​​​​

W hotels 15 licenses canceled | डब्ल्यु हॉटेलच्या १५ कुटिरांचे परवाने रद्द

डब्ल्यु हॉटेलच्या १५ कुटिरांचे परवाने रद्द

Next

पणजी - डब्ल्यु हॉेलची वागातोर येथील १५  कुटीरांचा परवाना गोवा किनारा नियमन (सीझेडएमए) विभागाकडून मागे घेण्यात आला आहे. त्यामुळे ही कुटिरे पाडावी लागणार आहेत. खंडपीठाने याचिका निकालात काढली. 

डब्ल्यु हॉटेल्सने १६ कुटीरे उभारण्यासाठी सीझेडएमएकडे परवानगी मागितली होती. परंतु ती नाकारण्यात आली होती. नंतर त्याच कुटिरांसाठी कृष्णा देसाई नामक व्यावसायिकाने परवानगी मागितली. त्यांना परवानगी देण्यातही आली. त्यामुळे गोवा फाउंडेशनतर्फे न्यायालयात सीझेडएमएच्या परवान्याला आव्हान दिले होते. ही बांधकामे बांधकाम प्रतिबंध विभागात येत असल्यामुळे ती बेकायदेशीर ठरत असल्याचा दावा याचिकेत करण्यात आला होता. तसेच कृष्णा देसाई व डब्ल्यु हॉटेलमध्ये झालेला करारही याचिकादाराने खंडपीठाच्या नजरेस आणून दिला. त्यात या कुटिरांद्वारे मिळणाºया उत्पन्नाची वाटणीचा उल्लेख होता. जी परवानगी नाकारण्यात आली होती ती मागिल दारातून देण्यात आल्याचेही याचिकादारातर्फे युक्तिवाद करताना अ‍ॅड नॉर्मा आल्वारीस यांनी न्यायालयाच्या नजरेस आणून दिले होते. हे प्रकरण पुन्हा सीझेडएमएकडे सोपविण्यात आले होते. सीझेडएमएकडून १५ कुटिरांची परवानगी मागे घेण्यात आल्याची माहिती खंडपीठात बुधवारी देण्यात आली. त्यामुळे बांधण्यात आलेली कुटीरे हॉटेलला पाडावी लागणार आहेत. ही याचिका निकालात काढण्यात आली.

Web Title: W hotels 15 licenses canceled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.