ऑनलाइन लोकमत 
म्हापसा, दि. 6 - पुण्याहून येणा-या एका खाजगी प्रवाशी व्होल्वो बसला उत्तर गोव्यातील पेडणे तालुक्यात तोरसे गावात राष्ट्रीय महामार्गावर अपघात झाला. पार्क करून ठेवलेल्या टॅँकरला बसने जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला.
 
सकाळी अंदाजे ८ च्या सुमारास घडलेल्या अपघातात चार प्रवाशी गंभीररित्या जखमी झाले आहेत. त्यात दोन पुरूष व एका महिलेचा समावेश आहे. सदर बस नाईक ट्रॅव्हल्स कंपनीची आहे. भरधाव वेगाने दुसºया वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात हा अपघात घडला. रस्त्याच्या कडेला पार्क करुन ठेवण्यात आलेल्या टॅँकरला जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला. 
 
अपघातात दोन्ही वाहनांची बरीच नासधूस झाली आहे. अपघातावेळी बसमध्ये सुमारे ३० प्रवासी असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. अधिक माहिती अपेक्षित आहे.