पणजीत राफेल प्रकरणी भाजप मोर्चाला हिंसक वळण

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2018 09:49 PM2018-12-21T21:49:00+5:302018-12-21T21:55:07+5:30

कार्यकर्ते भिडले : चपला, बाटल्यांचा मारा, धुमश्चक्रीमुळे पणजीत सव्वा तास वाहतूक कोंडी 

The violent turn of the BJP rally in Panaji | पणजीत राफेल प्रकरणी भाजप मोर्चाला हिंसक वळण

पणजीत राफेल प्रकरणी भाजप मोर्चाला हिंसक वळण

Next

पणजी : राफाल व्यवहार प्रकरणी मोदी सरकारला काँग्रेसने लक्ष्य बनविल्याने भाजप कार्यकर्त्यांनी येथील काँग्रेस भवनवर काढलेल्या मोर्चाला हिंसक वळण लागले. काँग्रेस कार्यकर्त्यांवर चपला, बाटल्या फेकण्यात आल्या तसेच धक्काबुक्की करण्यात आली. राहुल गांधींची प्रतिमा जाळून थयथयाट केला याप्रसंगी दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते भिडल्याने तणाव निर्माण झाला.कॉंग्रेस कार्यकर्त्यांनीही नंतर प्रत्युत्तरादाखल चपला फेकल्या आणि धक्काबुक्की केली. या धुमश्चक्रीत दयानंद बांंदोडकर मार्गावरील वाहतूक सुमारे सव्वा तास रोखली गेल्याने शहरात वाहतुकीची मोठी कोंडी झाली.

 

दुपारी ४.३0 च्या सुमारास भाजपचा मोर्चा काँग्रेस भवनजवळ आला असता दारात काँग्रेसी पदाधिकारी व कार्यकर्ते उपहासात्मक स्वागतासाठी हातात पुष्पगुच्छ, आरत्या, सामोसे, पेढे घेऊन उभे असल्याचे पाहून मोर्चेकºयांचे पित्त खवळले. पक्षाचे सरचिटणीस सतिश धोंड, प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर हे मोर्चाचे नेतृत्त्व करीत होते. तेथे उपस्थित अन्य कॉंग्रेसी पदाधिकाºयांशी शाब्दिक चकमक झडल्याने वातावरण आणखी तापले. ‘काँग्रेस मुर्दाबाद, राहुल गांधी मुर्दाबाद’च्या घोषणा देत कार्यकर्त्यांनी तेथे हंगामा केला. राहुल गांधी यांची प्रतिमा लाथाबुक्क्यांनी तुडवित चपला हाणल्या तसेच काँग्रेसी कार्यकर्त्यांवर चपला, बाटल्यांचा मारा केला. सोमासे, पेढे अस्ताव्यस्त फेकून थयथयाट केला. या सर्व प्रकरणात बराच वेळ पोलिसांनी मात्र बघ्याची भूमिका घेतली. 

            पोलिसांची बघ्याची भूमिका : अधिक्षक पोचल्या तासाभराने 

राजधानी शहरात मध्यवर्ती ठिकाणी रस्ता अडवून हा हंगामा चालू असताना उत्तर गोव्याच्या पोलिस अधिक्षक चंदन चौधरी या तासाभराने घटनास्थळी दाखल झाल्या. त्याआधी निरीक्षक सिध्दांत शिरोडकर, उपाधीक्षक नेल्सन आल्बुकर्क यांनी आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न केला परंतु ते अयशस्वी ठरले. आंदोलकांना मागे ढकलण्याचा प्रयत्न करीत होते परंतु पुन: आंदोलक चाल करुन येत होते. नंतर प्रकरण हाताबाहेर जात असल्याचे पाहून आंदोलकांना शांत राहण्याचा व रस्ता मोकळा करावा, अशी विनंती या दोन्ही सतीश धोंड, आत्माराम बर्वे यांनी कार्यकर्त्यांना केली परंतु कोणीही ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. आरोग्यमंत्री विश्वजित राणे, पंचायतमंत्री मॉविन गुदिन्हो हेही दाखल झाले. त्यांनीही कार्यकर्त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला शेवटी या दोन्ही मंत्र्यांनीही काढता पाय घेतला.  

Web Title: The violent turn of the BJP rally in Panaji

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.