Video : वास्कोत अशोका वृक्ष कोसळून दुचाकीस्वाराचा दुर्देंवी अंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2019 03:03 PM2019-06-22T15:03:27+5:302019-06-22T16:49:14+5:30

जेव्हा तो वास्कोच्या स्वतंत्रपथ मार्गावर पोचला त्यावेळी रस्त्याच्या बाजूला असलेले भलेमोठे अशोका वृक्ष येथे असलेल्या वीज खांब्यावर कोसळून ह्या खांब्यावर असलेल्या वीज वाहीनीसहीत झाड रस्त्यावर कोसळले

Vescot Ashoka tree collapses one person died | Video : वास्कोत अशोका वृक्ष कोसळून दुचाकीस्वाराचा दुर्देंवी अंत

Video : वास्कोत अशोका वृक्ष कोसळून दुचाकीस्वाराचा दुर्देंवी अंत

Next

वास्को: शनिवारी (दि.२२) पहाटे वास्कोतील स्वतंत्रपथ मार्गावर असलेले भलेमोठे जुने अशोका वृक्ष कोसळले असून यात खालून दुचाकीने जाणाऱ्या सतीश गोपाळ गावकर (वय ४१) ह्या इसमाचा दुर्देंवी अंत झाला. धारबांदोडा येथे राहणारा सतीश कामासाठी सकाळी सडा, मुरगाव येथे येत असताना हे झाड वीज खांब्यावर कोसळल्यानंतर त्याच्यावर असलेली एक वीज वाहीनी सतीशच्या गळ्यात अडकून मान तुटल्याने तो जागीच मरण पोचल्याची माहीती वास्को पोलीसांनी दिली.

वास्को पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक रितेश तारी यांनी दिलेल्या माहीतीनुसार पहाटे ६.१५ च्या सुमारास  सदर घटना घडली. सतीश अवजड वाहन चालवण्याचे काम करत असून सकाळी तो सडा येथे तांदळाचा साठा भरून ठेवलेले वाहन नेण्यासाठी आपल्या ‘पल्सर’ दुचाकीने येत होता. जेव्हा तो वास्कोच्या स्वतंत्रपथ मार्गावर पोचला त्यावेळी रस्त्याच्या बाजूला असलेले भलेमोठे अशोका वृक्ष येथे असलेल्या वीज खांब्यावर कोसळून ह्या खांब्यावर असलेल्या वीज वाहीनीसहीत झाड रस्त्यावर कोसळले. सदर घटनेत दुचाकीने जाणाºया सतीशच्या गळ्यात वीज वाहीनी अडकल्याने दुचाकीवरील ताबा जाऊन त्याला अपघाताच्या सामोरे जावे लागले. ह्या घटनेत सतीश जागीच मरण पोचल्याची माहीती पोलीस उपनिरीक्षक रितेश तारी यांनी दिली. पोलीसांना अपघाताची माहीती मिळताच त्यांनी त्वरित घटनास्थळावर दाखल होऊन पंचनामा करून नंतर सतीशचा मृतदेह शवचिकित्सेसाठी पाठवून दिला. सदर घटनेत सतीशची मान तुटल्याने तो जागीच मरण पोचल्याची माहीती शवचिकित्सेत स्पष्ट झाल्याचे उपनिरीक्षक तारी यांनी सांगितले.

वीज वाहीनी तुटून त्याच्या गळ्यात अडकल्याने त्याला वीजेचा झटका बसला होता काय याबाबत उपनिरीक्षक तारी यांना विचारले असता त्याला वीजेचा झटका बसला नसल्याची माहीती त्यांनी दिली. मयत सतीशच्या मृतदेहावर शवचिकित्सा केल्यानंतर त्याचा मृतदेह कुटूंबियांच्या ताब्यात देण्यात आला. सतीश काही काळापासून उसगाव येथे राहत असून पहाटे तो कामासाठी बाहेर निघाल्यानंतर ४५ किलोमीटर दूर असलेल्या वास्को शहरात त्याचा अशा प्रकारे दुर्देवी अंत झाल्याची माहीती त्याच्या गावात पसरताच त्यांना धक्काच बसला. वास्को स्वतंत्रपथ मार्गावर कोसळलेले हे भलेमोठे अशोका वृक्ष भरपूर जुने असून यामुळे भविष्यात धोका निर्माण होण्याची भीती यापूर्वी अनेकांनी व्यक्त केली होती. यापूर्वी वास्कोतील जुनी भलीमोठी वृक्ष कोसळण्याच्या काही घटना घडलेल्या असून शहरात अशा प्रकारची अन्यकाही जुनी धोकादायक वृक्षे आहेत. सतीश गावकर सारख्या अन्य कोणी निष्पाप नागरीकाचा भविष्यात जीव न जावा यासाठी मुरगाव नगरपालिकेने व संबंधित विभागाने याबाबत त्वरित अचुक पावले उचलण्याची गरज असल्याची मागणी नागरीकांकडून होत आहे. 

Web Title: Vescot Ashoka tree collapses one person died

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.