पाद्रीभाट-नेसाय येथे दुचाकींची समोरासमोर धडक; दोन ठार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2019 04:38 PM2019-06-18T16:38:46+5:302019-06-18T16:39:16+5:30

एका मुलीसह दोघेजण जखमी

Two killed in Two-wheelers accident at goa | पाद्रीभाट-नेसाय येथे दुचाकींची समोरासमोर धडक; दोन ठार

पाद्रीभाट-नेसाय येथे दुचाकींची समोरासमोर धडक; दोन ठार

Next

मडगाव: मडगावपासून 8 कि. मी. अंतरावर असलेल्या पाद्रीभाट - नेसाय येथे सोमवारी दुपारी झालेल्या भीषण अपघातात दोघांना मृत्यू आला. दोन दुचाक्यांची समोरा समोर झालेल्या टक्करीत हा अपघात झाला. या अपघाताची भीषणता म्हणजे, मुश्तफा कासीम शेख या 30 वर्षीय युवकाला जागीर मरण आले. तर कायतान रिबेलो (52) याच्यावर गोवा वैद्यकीय महाविद्यालयात उपचार चालू असताना रात्री उशिरा त्याचे निधन झाले. या अपघातात अन्य दोन जखमी झाले आहेत.


सोमवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. राँग साईडने आलेल्या मुस्तका शेख याने रिबेलो यांच्या दुचाकीला धडक दिली. रिबेलो याच्या डोक्याला जबर मार बसल्याने त्याला गोमेकॉत हलविण्यात आले. त्याच्यामागे बसलेली त्याची  16 वर्षाची मुलगी प्रीती हिही जखमी झाली. दुसऱ्या मोटरसायकलच्या मागे बसलेल्या सुलेमान सय्यद हाही जखमी झाल्याने त्या दोघाना हॉस्पिसियोत उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.


मायणा-कुडतरी पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, जखमी झालेल्या कायतानची प्रकृती गंभीर असल्याने त्याला तातडीने गोमेकॉत हलविण्यात आले होते. तिथे त्याच्यावर उपचार चालू असतानाच रात्रीच त्याला मृत्यू आला. त्याची 16 वर्षाची मुलगी प्रिती हिही या अपघातात जखमी झाली होती. तिच्यावर मडगावच्या हॉस्पिसियो इस्पितळात उपचार चालू आहेत. या अपघातात सुलेमान सय्यद हा आणखी एक 31 वर्षाचा युवक जखमी झाला होता.


सदर अपघात सोमवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास झाला होता. मिळालेल्या माहितीनुसार, कायतान रिबेलो हा सकाळी आपल्यावर उपचार करुन घेण्यासाठी बांबोळी येथे गोमेकॉत गेला होता. त्यानंतर दुपारी नावेलीत शिकणा:या आपल्या मुलीला घेऊन तो परत घरी जात होता. यावेळी नेसाय येथे समोरुन येणा:या दुचाकीची त्याला धडक बसली. या अपघाताची भीषणता एवढी होती की एकटा जाग्यावरच ठार झाला.
 

Web Title: Two killed in Two-wheelers accident at goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.