गोव्यात सनबर्न ईडीएम, हजारो पर्यटक येणार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2019 11:21 AM2019-02-21T11:21:56+5:302019-02-21T11:26:38+5:30

गोव्यामध्ये येत्या शनिवार व रविवारी सनर्बन क्लासिक हा इलेक्ट्रॉनिक नृत्य महोत्सव (ईडीएम) होणार आहे. त्यानिमित्ताने हजारो पर्यटक उत्तर गोव्याच्या किनारपट्टीतील वागातोर या भागात एकत्र येतील.

Sunburn returns to Goa this weekend | गोव्यात सनबर्न ईडीएम, हजारो पर्यटक येणार

गोव्यात सनबर्न ईडीएम, हजारो पर्यटक येणार

Next
ठळक मुद्देजर्मन, डच, कॅनडा आदी ठिकाणचे डीजे आणि इलेक्ट्रॉनिक म्युझिक क्षेत्रातील मान्यवर यावेळच्या महोत्सवात सहभागी होणार आहेत. गोव्यामध्ये येत्या शनिवार व रविवारी सनर्बन क्लासिक हा इलेक्ट्रॉनिक नृत्य महोत्सव (ईडीएम) होणार आहे. यंदा सनबर्न क्लासिक या नावाखाली हा इलेक्ट्रॉनिक डान्स महोत्सव होत आहे.

पणजी - गोव्यामध्ये येत्या शनिवार व रविवारी सनर्बन क्लासिक हा इलेक्ट्रॉनिक नृत्य महोत्सव (ईडीएम) होणार आहे. त्यानिमित्ताने हजारो पर्यटक उत्तर गोव्याच्या किनारपट्टीतील वागातोर या भागात एकत्र येतील. अशा महोत्सवात अखंडीतपणे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पर्यटकांकडून नृत्य केले जाते. बरेच स्थानिकही अशा महोत्सवात सहभागी  होतात.

दोन वर्षे गोव्यात सनबर्न महोत्सव झाला नव्हता. गोव्याऐवजी तो पुण्यात झाला होता. यंदा सनबर्न क्लासिक या नावाखाली हा इलेक्ट्रॉनिक डान्स महोत्सव होत आहे. यापूर्वी गोव्यात काही कंपन्यांनी केलेल्या ईडीएममध्ये अंमली पदार्थाचाही वापर झाला होता. बंगळुरुच्या एका पर्यटकाचा अंमली पदार्थाच्या अतिसेवनामुळे मृत्यूही झाला होता. तथापि, सनबर्न क्लासिक ईडीएममध्ये ड्रग्जचा वापर होणार नाही याची काळजी पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी विभागाकडून घेतली जाईल अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली आहे. कळंगुट- कांदोळीच्या पट्टय़ात अगोदर ईडीएम होत होते.

एकाचवेळी म्हणजे डिसेंबर महिन्यात दोन ईडीएम पूर्वी होत असे व त्यामुळे किनारपट्टीत वाहतुकीची कोंडी होत असे. तसेच पोलिसांकडून दिल्या जाणाऱ्या सुरक्षा व्यवस्थेवरही मोठा ताण येत असे. त्यामुळे पोलिसांनी एकाचवेळी दोन ईडीएमला परवानगी दिली जाऊ नये तसेच डिसेंबर महिन्यात तर ईडीएम नकोच असे मत व्यक्त केले होते. यावेळी डिसेंबर महिन्यात सरकारने ईडीएमला परवानगी दिली नाही. यावेळी वागातोरला ईडीएम होत असल्याने  व यावेळचा ईडीएम हा छोट्या स्वरुपात असल्याने वाहतूक व्यवस्था हाताळणे पोलिसांना थोडे सोपे जाऊ शकते. तथापि, जेव्हा प्रत्यक्ष ईडीएम होईल, तेव्हाच काही समस्या किंवा अडथळे कळून येतील. सनबर्न क्लासिक या नावाने गोव्यात प्रथमच होत असलेल्या या ईडीएमचे पर्यटन मंत्री बाबू आजगावकर यांनी समर्थन केले आहे. पर्यटकांना गोव्याकडे आकर्षित करण्यासाठी आम्हाला अशा प्रकारचे ईडीएम हवे, अशी भूमिका मंत्री आजगावकर यांनी मांडली आहे. अर्ज आल्यानंतर सरकारने तातडीने परवानगी दिली. शनिवारी दुपारी तीन वाजता सनबर्न क्लासिक ईडीएमला सुरूवात होईल. जर्मन, डच, कॅनडा आदी ठिकाणचे डीजे आणि इलेक्ट्रॉनिक म्युझिक क्षेत्रातील मान्यवर यावेळच्या महोत्सवात सहभागी होणार आहेत. 

Web Title: Sunburn returns to Goa this weekend

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.