6 दिवस सेफ्टी पीन फुफ्फुसात, मडगावच्या मुलीवर मुंबईत यशस्वी ब्रान्स्कोस्कोपी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2018 11:04 PM2018-12-04T23:04:34+5:302018-12-04T23:05:18+5:30

स्कार्फ बांधण्यासाठी तोंडात घेतलेली सेफ्टी पीन चुकून आत गेली व फुफ्फुसात जावून अडकली

Successful Branscoscopy in Mumbai for 6 days in mumbai, Madgaon's girl | 6 दिवस सेफ्टी पीन फुफ्फुसात, मडगावच्या मुलीवर मुंबईत यशस्वी ब्रान्स्कोस्कोपी

6 दिवस सेफ्टी पीन फुफ्फुसात, मडगावच्या मुलीवर मुंबईत यशस्वी ब्रान्स्कोस्कोपी

पणजी : स्कार्फ बांधण्यासाठी तोंडात घेतलेली सेफ्टी पीन चुकून आत गेली व फुफ्फुसात जावून अडकली, तीन महाविद्यालये व दोन इस्पितळात गेले असता शस्त्रक्रियेशिवाय पर्याय नसल्याचे सांगण्यात आले. कोणतीही चिरफाड करणाऱ्या शस्त्रक्रियेशिवाय मुंबईतील एका खासगी इस्पितळात लवचिक ब्रान्स्कोस्कोपने ती पीन बाहेर काढण्यास यश मिळाले. हा भयानक प्रकार मडगाव येथील एका 18 वर्षीय मुलीवर बेतला होता. 

तोंडात घातलेली पीन आत गेली एवढेच या मुलीला ठाऊक होते. ही पीन तिच्या फुफुसांत अडकल्याचे एक्सरेतून आढळून आले. ती एण्डोस्कोपीद्वारे काढण्याचा प्रयत्न गोव्यातील एका इस्पितळात करण्यात आला, परंतु तो अपयशी ठरला. दोन महाविद्यालये व दोन इतर इस्पितळात जाऊनही त्यांनी पाहिले. परंतु सर्व ठिकाणी शस्त्रक्रिया करण्याशिवाय पर्याय नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे कुटुंबीय तिला घेऊन मुंबईतील एका मल्टीस्पेशलिटी सुविधा असलेल्या इस्पितळात गेले. त्या ठिकाणी लवचिक ब्रान्स्कोप्कोपद्वारे ही पीन मुलीला कोणतीही इजा न करता काढण्यात यश मिळाले. या प्रकारात नाकातून एक धातूची वायर शरिरात घातली जाते. त्याच्या अग्रावर कॅमरा व एक उजेडासाठी बल्बही असतो. तसेच अडकलेला पदार्थ खेचण्यासाठी व्यवस्थाही असते. त्याद्वारे पदार्थ अलगदपणे काडला जातो. 6 दिवस ही मुलगी फुफ्फुसात पीन घेऊन होती. तिची फुफ्फुसे व्यवस्थित असल्याची माहितीही डॉक्टरकडून देण्यात आली.

Web Title: Successful Branscoscopy in Mumbai for 6 days in mumbai, Madgaon's girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.