क्रीडा खात्याचे मंत्री खंवटेंकडून वाभाडे, खेळाडूंची उपेक्षा न करण्याचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2018 10:41 PM2018-02-21T22:41:35+5:302018-02-21T22:41:43+5:30

क्रीडा खात्याला चांगले मंत्री लाभले आहेत. मात्र त्या खात्याच्या अधिका-यांना व कर्मचा-यांना खेळ व खेळाडूंविषयी काही कळते की नाही, असा प्रश्न करत राज्याचे महसूलमंत्री रोहन खंवटे यांनी बुधवारी विधानसभेत खंटवे यांनी खात्याच्या कारभाराचे वाभाडेच काढले.

Sports Minister Khawavten advised not to neglect the players | क्रीडा खात्याचे मंत्री खंवटेंकडून वाभाडे, खेळाडूंची उपेक्षा न करण्याचा सल्ला

क्रीडा खात्याचे मंत्री खंवटेंकडून वाभाडे, खेळाडूंची उपेक्षा न करण्याचा सल्ला

Next

पणजी : क्रीडा खात्याला चांगले मंत्री लाभले आहेत. मात्र त्या खात्याच्या अधिका-यांना व कर्मचा-यांना खेळ व खेळाडूंविषयी काही कळते की नाही, असा प्रश्न करत राज्याचे महसूलमंत्री रोहन खंवटे यांनी बुधवारी विधानसभेत खंटवे यांनी खात्याच्या कारभाराचे वाभाडेच काढले. फाईल्स केवळ फिरवत ठेवत खेळाडूंची उपेक्षा करू नका, असा सल्ला मंत्री खंवटे यांनी दिला.
यश फडते या गोमंतकीयाने अमेरिकेत ज्युनियर स्क्वॉश चॅम्पियनशीपमध्ये सुवर्णपदक पटकाविले. क्रीडा खाते तथा सरकारने त्याच्यासाठी काही केले नाही. त्याच्या वडिलांनी खूप कष्ट घेतले, असे मत काही आमदारांनी मांडले. कुडचडेचे आमदार निलेश काब्राल यांनी फडते याच्या अभिनंदनाचा ठराव मांडला होता. आपण यशच्या वडिलांना सलाम करतो, असे काब्राल म्हणाले.

वास्कोचे आमदार कालरुस आल्मेदा यांनीही त्याचे कौतुक केले. मंत्री माविन गुदिन्हो यांनीही फडते याच्या यशाविषयी गौरवोद्गार काढले. खेळाडूंना सरकारकडून प्रोत्साहन हवे असते, असे सांगत काँग्रेसचे आमदार नीळकंठ हळरणकर यांनीही फडते याच्या कामगिरीचे कौतुक केले. मंत्री खंवटे यांनी क्रीडा खात्याच्या कारभाराबाबत तीव्र नापसंती व्यक्त केली. क्रीडा खाते हे योग्य मंत्र्याकडे आहे पण या खात्याचे जे अधिकारी आहेत त्यांना खेळाडू व खेळ म्हणजे काय ते शिकविण्याची वेळ आली आहे. त्यांना काही सोयरसुतकच नाही.

राज्यात चमकणारे खेळाडू मग अचानक कुठे गायब होतात, त्यांच्या आयुष्याचे पुढे काय होते हे त्या खात्याने जाणून घ्यावे. त्यांनी बॉक्सिंग संघटनेच्याही एका फाईलचे उदाहरण दिले. तीन वर्षे फाईल फिरत राहते, असे मंत्री खंवटे यांनी सांगून लवकर निर्णय व्हावे म्हणून आम्ही किती म्हणून डोके आपटावे असा प्रश्न संतप्त होत विचारला. खात्याच्या खालच्या स्तरावरील जे अधिकारी आहेत, त्यांचा कारभार सुधारायला हवा, असे खंवटे म्हणाले. मंत्री बाबू आजगावकर यांनीही यश फडते याचे अभिनंदन केले. अशा प्रकारच्या खेळाडूंचा अभिमान वाटतो असे आजगावकर म्हणाले व मंत्री खंवटे यांनी मांडलेले मुद्देही त्यांनी मान्य केले. अशा प्रकारच्या खेळाडूंकडे खात्याच्या संचालकांनी लक्ष द्यायला हवे. आम्ही अशा खेळाडूंना काहीच कमी पडू देऊ नये. सरकार आपल्या मागे नाही असे अशा खेडाळूंना वाटता कामा नये. आमदारांनी यश फडते यास आपल्याकडे घेऊन यावे. सरकारच्यावतीने मदत करण्यासाठी व प्रोत्साहन देण्यासाठी आपण सर्व काही करीन, असे मंत्री आजगावकर म्हणाले.

Web Title: Sports Minister Khawavten advised not to neglect the players

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा