पोलिसांना वाहतूक नियमांचा भंग करणा-यांचे फोटो पाठवून मिळविले ६९ हजारांचे बक्षिस 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2018 07:55 PM2018-02-09T19:55:54+5:302018-02-09T19:56:15+5:30

वाहतूक नियमांचा भंग करणा-यांना कॅमे-यात टिपून या उल्लंघनाचे फोटो, व्हिडिओ चित्रफिती वॉटसअपवर पोलिसांना पाठवणा-या ‘ट्राफिक सेंटिनल’ योजनेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

The reward of 69 thousand rupees received by sending photographs of traffic violators to the police | पोलिसांना वाहतूक नियमांचा भंग करणा-यांचे फोटो पाठवून मिळविले ६९ हजारांचे बक्षिस 

पोलिसांना वाहतूक नियमांचा भंग करणा-यांचे फोटो पाठवून मिळविले ६९ हजारांचे बक्षिस 

Next

पणजी : वाहतूक नियमांचा भंग करणा-यांना कॅमे-यात टिपून या उल्लंघनाचे फोटो, व्हिडिओ चित्रफिती वॉटसअपवर पोलिसांना पाठवणा-या ‘ट्राफिक सेंटिनल’ योजनेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. अशा त-हेच्या वेगवेगळ्या उल्लंघनाची तब्बल २५ हजार छायाचित्रे पोलिसांना पाठवणा-या करंझाळे येथील आदित्य कटारिया याला तब्बल ६९ हजार रुपयांचे बक्षिस आणि प्रमाणपत्र पोलिस महासंचालक मुक्तेश चंदर यांनी बहाल केले. या योजनेत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनीही मोठ्या संख्येने सहभागी करुन घेतले जाईल, असे चंदर यांनी याप्रसंगी स्पष्ट केले. 

सिग्नल तोडणे, नो एंट्रीमधून वाहन हाकणे, वाहन चालविताना मोबाइलवर बोलणे, योग्य नंबरप्लेट नसणे, सीट बेल्ट परिधान न करणे, दुचाकी चालविताना हेल्मेट परिधान न करणे, काळ्या काचा असलेली मोटार,  दुचाकीवर तीन-चार जणांना बसवून वाहन हाकणे आदी व अशाच प्रकारच्या अन्य वाहतूक नियमभंगाची प्रकरणे कॅमेºयात टिपून पोलिसांच्या ७८७५७५६११0 मोबाइलवर पाठविल्यास संबंधित वाहनचालकांवर कारवाई केली जाते. तसेच अशी छायाचित्रे किंवा चित्रफिती पाठवणाºयास प्रमाणपत्रे व त्याने मिळविलेल्या गुणांनुसार रोख बक्षिस दिले जाते. १00 गुण झाल्यास १ हजार रुपये याप्रमाणे बक्षिस दिले जाते. गेल्या वेळी २३ जणांना मिळून एकूण १ लाख ४ हजार रुपये बक्षिसाचे वितरण झाले. तर काल झालेल्या कार्यक्रमात १७ जणांना एकूण २ लाख ३0 हजार रुपयांचे बक्षिस वितरण झाले.

आदित्य कटारिया याने ६९00 गुण मिळवून ६९ हजार रुपयांचे बक्षिस प्राप्त केले. दामोदर कुराडे या अन्य एका व्यक्तिने ५३ हजार रुपये बक्षिस मिळविले. १७ जणांपैकी इतरांना १ हजार रुपयापासून १६ हजार रुपयांपर्यंत बक्षिसे मिळाली. आतापर्यंत या योजनेत १५00 जणांनी नोंद केली आहे. जी कोणी व्यक्ती वाहतूक उल्लंघनांबाबतची माहिती पोलिसांना देते त्याला पूर्ण संरक्षण देण्यास पोलिस कटिबध्द आहेत आणि त्यांना कोणाकडूनही अपाय होणार नाही याची काळजी पोलिस घेतील, असे चंदर यांनी सांगितले. 

वाहनचालकांनी वाहतुकीचे नियम पाळावेत, अपघातांचे प्रमाण कमी व्हावे हा या योजनेमागचा हेतू असून त्याचे चांगले फलित दिसून येत असल्याचा दावाही महासंचालकांनी केला. याप्रसंगी वाहतूक पोलिस अधिक्षक दिनराज गोवेकर, उपाधीक्षक धर्मेश आंगले, निरीक्षक ब्रॅण्डन डिसोझा आदी उपस्थित होते. 

-  ७८७५७५६११0 वर उल्लंघनाचे फोटो किंवा क्लिप पाठवता येईल. पण त्यासाठी आधी या नंबरवर मॅसेज पाठवून स्वत:ची नोंदणी करावी लागेल. स्वत:चे नाव, मोबाइल क्रमांक, व इमेल आयडी पाठवून नोंदवून नंतर फोटो पाठवता येतील. स्वत:चा मोबाइल क्रमांक हाच युनिक आयडी असेल. त्या क्रमांकाचा उल्लेख करावा लागेल. 

- १00 ते २00 पाँइंटस करणा-यांना सहा महिन्यानंतर किंवा वर्षभरानंतर बंपर ड्रॉ मध्ये सहभागी होता येईल. बक्षीस म्हणून स्कू टी दिली जाईल. 

Web Title: The reward of 69 thousand rupees received by sending photographs of traffic violators to the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.