रेडय़ाने घेतला गोव्यात  एका युवकाचा बळी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2018 08:59 PM2018-04-18T20:59:18+5:302018-04-18T20:59:18+5:30

धीरयोच्या रेडयाने एका युवकाचा बळी घेण्याची घटना गोव्यातील सासष्टी तालुक्यातील किनारपटटीभागात घडली. कोलवा पोलीस ठाण्याच्या हददीतील पालकोट - ओडली येथे रेडयाने किल्टन फर्नाडीस या बावीस वर्षीय युवकाच्या पाठीमागे शिंग खुपसल्याने त्याला जागीच मृत्यू आला.

Radha took the victim of a young man in Goa | रेडय़ाने घेतला गोव्यात  एका युवकाचा बळी

रेडय़ाने घेतला गोव्यात  एका युवकाचा बळी

Next

- सूरज पवार

 मडगाव  - धीरयोच्या रेडयाने एका युवकाचा बळी घेण्याची घटना गोव्यातील सासष्टी तालुक्यातील किनारपटटीभागात घडली. कोलवा पोलीस ठाण्याच्या हददीतील पालकोट - ओडली येथे रेडयाने किल्टन फर्नाडीस या बावीस वर्षीय युवकाच्या पाठीमागे शिंग खुपसल्याने त्याला जागीच मृत्यू आला. अनैसर्गिक मृत्यू म्हणून तुर्त कोलवा पोलिसांनी हे प्रकरण नोंदवून घेतले असून, रेडा मालकाचा शोध घेतला जात असल्याची माहिती कोलवा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक फिलोमिना कॉस्ता यांनी दिली आहे.
कायदेशीर मनाई असली तरी रेडयाच्या या झुंजीचे फॅड गोव्यात मोठया प्रमाणात असून, विशेषता सासष्टी तालुक्यात अनेकजण आपल्या पदरी रेडेही सांभाळतात. हेच रेडे जीवावरही बेतात हे आज बुधवारी सांयकाळी या  घटनेमुळे पुन्हा एकदा सिध्द झाले आहे. काहीवर्षापुर्वी फातोर्डा येथे धीरयाच्यावेळी रेडयाने एका युवकावर हल्ला केल्याने त्याचा मृत्यू झाला होता. राजकीय अभयामुळे पोलीसही धीरयावर कारवाई करतात कचरतात असा आरोप प्राणीप्रिय नागरिकांकडून सातत्याने होतो.
 आपल्या मित्रसमवेत  क्लिटन हा युवक रेडा  चरण्यासाठी घेउन गेला होता. परत येत असताना रेडयाने त्याच्यावर हल्ला चढविला. त्यात त्याचे जागीच निधन झाले. सांयकाळी पावणोसहाच्या दरम्यान ही घटना घडली.मयताबरोबर असलेल्या त्या युवकाची जबानी नोंद करुन रेडयाच्या मालकाचा शोध घेतला जाईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

Web Title: Radha took the victim of a young man in Goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.