ऑनलाइन लोकमत

पणजी, दि. 06 - पणजीत कला अकादमी आणि परिसरात लोकोत्सव सुरु झालेला आहे. विविध राज्यांतील लोककलांचे जतन आणि संवर्धनासाठी पुढाकार घेऊन गोवा सरकार हा लोकत्सोव आयोजित केला आहे. दहा दिवस चालणा-या या रंगारंग सोहळ्याचा शुक्रवारी प्रारंभ झाला असून यामध्ये ओरीसातील गोटीपुआ, प. बंगालमधील पुरूलीया छाव, ओरिसामधील संभलपुरी आणि राजस्थानमधील भवाई नृत्य सादर करण्यात आले. 


पुरूलीया छाव (पश्चिम बंगाल)


गोटीपुआ ( ओरीसा)

भवाई नृत्य (राजस्थान)

संभलपुरी ( ओरीसा)

( सर्व छाया : गणेश शेटकर, पणजी, गोवा)