मनोहर पर्रीकरांनी सन्मानाने मुख्यमंत्रीपद सोडावे, राष्ट्रवादीची मागणी 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2018 07:42 PM2018-11-15T19:42:01+5:302018-11-15T19:54:12+5:30

मनोहर पर्रीकर यांनी सन्मानाने मुख्यमंत्रीपद सोडावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जुङो फिलिप डिसोझा यांनी गुरुवारी येथे पत्रकार परिषदेत केली.

Parrikar should Chief Minister, NCP's demand | मनोहर पर्रीकरांनी सन्मानाने मुख्यमंत्रीपद सोडावे, राष्ट्रवादीची मागणी 

मनोहर पर्रीकरांनी सन्मानाने मुख्यमंत्रीपद सोडावे, राष्ट्रवादीची मागणी 

Next

पणजी : मनोहर पर्रीकर यांनी सन्मानाने मुख्यमंत्रीपद सोडावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जुङो फिलिप डिसोझा यांनी गुरुवारी येथे पत्रकार परिषदेत केली. तसेच लोकसभा निवडणुकीवेळी उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपला उमेदवार उभा करील, असेही त्यांनी जाहीर केले.

सतिश नारायणी यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवा अध्यक्षपदी नियुक्ती झाली असल्याचे जुङो फिलिप यांनी स्पष्ट केले. यापुढे लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला शाखेच्याही अध्यक्ष नियुक्त केल्या जातील. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काम आम्ही वाढवणार असून मांद्रे व शिरोडातील पोटनिवडणुकीवेळीही उमेदवार उभे करण्याचा विचार आहे  व त्यासाठी कार्यकत्र्यानी काम सुरू केले आहे. लोकसभा निवडणुकीवेळी तर उत्तर गोव्याची जागा यापूर्वीही राष्ट्रवादीने लढवलेली आहे. महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादीची युती आहे. गोव्यातही युती असल्याचे आम्ही मानतो. काँग्रेसने उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीसाठी सोडावा, असे जुङो फिलिप डिसोझा म्हणाले.

पर्रीकर यांच्याविषयी बोलताना जुङो फिलिप म्हणाले, की पर्रीकर यांच्या मंत्रिमंडळात 2000 साली मी काम केले आहे. त्यांच्या कार्यक्षमतेविषयी प्रश्न नाही पण सध्या लोकांचे सगळेच प्रश्न रेंगाळत पडले आहेत. प्रशासन होरपळत आहे व जनतेचेही हाल सुरू आहेत. र्पीकर आजारी असल्याने कामाला न्यायच देऊ शकत नाहीत. त्यामुळे त्यांनी सन्मानाने मुख्यमंत्री पदापासून दूर व्हावे व दुस:या कोणत्याही नेत्याकडे पद सोपवावे, असे जुङो फिलिप म्हणाले.

धारगळमध्ये लोकांवर अन्याय  

दरम्यान, धारगळमध्ये गरीब शेतक-यांची 6 लाख चौरस मीटर क्षेत्रफळाची जागा आयुष मंत्रलयाने कवडीमोल दराने ताब्यात घेतली. प्रत्यक्षात 8 लाख चौरस मीटर क्षेत्रफळाची जागा मंत्रलयाने प्राप्त केली. त्यापैकी दोन लाख चौरस मीटर एवढीच वापरली जाईल. केवळ पंचवीस रुपये प्रति चौरस मीटर दराने ही जागा ताब्यात घेतली गेली आहे. धारगळच्या लोकांवर सरकारने अन्याय केला. केवळ अकरा लाख रुपयांची भरपाई दिली व शिरोडय़ात मात्र 1 लाख 80 हजार चौरस मीटरच्या जागेसाठी सुभाष शिरोडकर यांना सरकारने 70 कोटींची भरपाई दिली, असे उपाध्यक्ष संजय बर्डे म्हणाले. धारगळच्या लोकांनी जर भाजपमध्ये उडय़ा टाकल्या असत्या, तर त्या लोकांना शिरोडकरांप्रमाणोच र्पीकर सरकार जास्त भरपाई देणार होते. र्पीकर यांनी घरी झोपून राज्याचा कारभार चालवू नये, असे बर्डे म्हणाले.यावेळी अविनाश भोसले, अनिल जोलापुरे, सतिश नारायणी, राजन साटेलकर उपस्थित होते.

Web Title: Parrikar should Chief Minister, NCP's demand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.