ऑम्लेट पाव अन् चिकन पदार्थ विकणारे गाडे पाडले बंद, महापालिकेची धडक कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2019 10:15 PM2019-03-20T22:15:14+5:302019-03-20T22:15:52+5:30

महापौर उदय मडकईकर म्हणाले की, पावसाळ्याच्या पूर्वतयारीनिमित्त गटारे उपसण्याचे काम हाती घेतले तेव्हा हा प्रकार आढळून आला.

Offensive vehicles, octal pots and chicken warehouses, shut down of the municipal corporation in panaji | ऑम्लेट पाव अन् चिकन पदार्थ विकणारे गाडे पाडले बंद, महापालिकेची धडक कारवाई

ऑम्लेट पाव अन् चिकन पदार्थ विकणारे गाडे पाडले बंद, महापालिकेची धडक कारवाई

पणजी : शहरातील डॉन बॉश्को स्कूलजवळ असलेले ऑम्लेट पाव, कोल्ड्रींक, चिकनचे पदार्थ विकणारे गाडे महापालिकेने धडक कारवाईत बंद पाडले. गाडेवाले याठिकाणी गटारांमध्ये हाडे तसेच अन्य टाकाऊ साह्त्यि फेकत होते. त्यामुळे गटारे तुंबलेली आहेत. या भागात दुर्गंधीही पसरलेली आहे. 

महापौर उदय मडकईकर म्हणाले की, पावसाळ्याच्या पूर्वतयारीनिमित्त गटारे उपसण्याचे काम हाती घेतले तेव्हा हा प्रकार आढळून आला. या ठिकाणची गटारे तुंबलेली आहेत. त्यामुळे सांडपाण्याचा प्रवाहही बंद होऊन दुर्गंधी निर्माण झाली आहे. गाडेवाल्यांना कडक समज देऊनही हे प्रकार चालूच राहिले. त्यामुळे आता कठोर कारवाईशिवाय गत्यंतर नाही. शहरात एकूण 92 गाडे असून मिरामार किनाऱ्यावरही भेलपुरीचे अनेक गाडे आहेत. या गाडेवाल्यांनी योग्यरित्या कचरा विल्हेवाट लावावी, अशी अपेक्षा असल्याचे मडकईकर म्हणाले. 

मध्यरात्रीपर्यंत चालणारे हे गाडे खवय्यांसाठी मोठा आधार होता. पुढील किमान तीन दिवस हे गाडे बंद राहणार असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे पर्यटनाची राजधानी असलेल्या पणजीत खवय्यांची घोर निराशा झाली आहे. 
 

Web Title: Offensive vehicles, octal pots and chicken warehouses, shut down of the municipal corporation in panaji

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.