सेन्टिनल्सच्या माध्यमातून गोव्यात पावणेदोन लाख वाहन चालकांना नोटिसा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2019 05:48 PM2019-01-07T17:48:46+5:302019-01-07T17:49:54+5:30

गोव्यातील वाहन चालकांमध्ये शिस्त यावी यासाठी वाहतुक पोलिसांनी सुरु केलेल्या ''ट्रॅफिक सेन्टिनल्स'' या योजनेला अपेक्षेपेक्षा अधिक सकारात्मक फायदा झाला आहे.

 Notices to 1.75 lakhs drivers in Goa through Centuries | सेन्टिनल्सच्या माध्यमातून गोव्यात पावणेदोन लाख वाहन चालकांना नोटिसा

सेन्टिनल्सच्या माध्यमातून गोव्यात पावणेदोन लाख वाहन चालकांना नोटिसा

Next

- सुशांत कुंकळयेकर 

मडगाव - गोव्यातील वाहन चालकांमध्ये शिस्त यावी यासाठी वाहतुक पोलिसांनी सुरु केलेल्या ''ट्रॅफिक सेन्टिनल्स'' या योजनेला अपेक्षेपेक्षा अधिक सकारात्मक फायदा झाला आहे. या सेन्टीनल्सच्या भीतीने दुचाकी चालकांनी हेल्मेटशिवाय वाहन चालविणे जवळपास बंद केल्याने रस्त्यावरील अपघाती मृत्यूच्या प्रमाणातही 22 टक्क्यांनी घट झाली आहे.

वाहतूक नियमांचा भंग करणा-या वाहन चालकांची माहिती वाहतूक पोलिसांना मिळावी यासाठी सामान्य नागरिकांच्या माध्यमांतून मागच्यावर्षी ही सेन्टील्सची योजना सुरु केली होती. ज्या वाहन चालकांकडून वाहतूक नियमांचा भंग केला जातो त्यांची तक्रार छायाचित्रच्या आणि व्हिडिओच्या स्वरुपात या सेन्टिनल्सद्वारा पोलिसांर्पयत पोहोचण्याची व्यवस्था करण्यात आली होती. या योजनेविरोधात गोव्यात वाहन चालकांकडून प्रचंड नाराजी व्यक्त केली जात असली तरी सामान्य नागरिकांनी या योजनेत स्वत:हून भाग घेतल्याचे वर्षअखेर दिसून आले. अशाप्रकारे सेन्टीनलच्या नजरेखाली आलेल्या वाहतूकीचा नियम मोडणा-या तब्बल 1.75 लाख लोकांना आतार्पयत वाहतूक पोलिसांच्या नोटीसा रवाना झाल्या आहेत. अशी माहिती वाहतूक विभागाचे पोलीस अधीक्षक दीनराज गोवेकर यांनी दिली.

सध्या गोव्याच्या वाहतूक पोलीस विभागाकडे एकूण 3642 सेन्टीनल्स अधिकृतरित्या नोंद झाली असून,प्रत्येक दिवशी त्यात किमान 20 नव्या सेन्टीनल्सची भर पडत आहे. एकूण दहा प्रकारच्या नियमांचे उल्लंघन करणा-या वाहन चालकांची माहिती या सेन्टीनल्सच्या माध्यमातून गोवा पोलिसांना मिळू लागली असून या माहितीसाठी प्रत्येक सेन्टीनलला 100 गुणांमागे एक हजार रुपये बक्षिस रुपात मिळत आहे.

गोवेकर यांनी दिलेल्या माहितीप्रमाणो, आतार्पयत 1.75 लाख लोकांना नियम भंगाच्या नोटीसा जारी केल्या असून सध्या पणजी आल्तीनो कार्यालयात तर मडगावात उपअधीक्षक कार्यालयात हे चलन्स भरण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. लवकरच आता उत्तर गोव्यात म्हापसा व डिचोली तर दक्षिण गोव्यात कुडचडे, काणकोण, वास्को व फोंडा अशा सहा नव्या ठिकाणी ही सोय उपलब्ध करुन दिली जाणार आहे. त्याशिवाय ऑनलाईनवर दंडाची रक्कम भरण्याची सुविधाही उपलब्ध आहे.

या सेन्टिनल प्रयोगाला कित्येक जणांकडून विरोध होत असला तरी त्याचा परिणाम चांगला दिसू लागला आहे. या सेन्टिनल्सच्या भीतीने विशेषत: दुचाकी वाहनचालक हेल्मेट परिधान करु लागल्यामुळे रस्त्यावरील अपघाती मृत्यूचे प्रमाण कमी झाल्याचे दिसून आले आहे. 2017 च्या तुलनेत 2018 साली अपघातात मृत्यू आलेल्याची संख्या 73 ने कमी झाली आहे. सेन्टिनल हा प्रयोग केवळ पैसे कमविण्यासाठी पोलिसांनी सुरु केलेला नसून वाहन चालकांमध्ये शिस्त यावी आणि त्यांना सुरक्षा मिळावी या उद्देशाने असून प्रवाशांच्या सुरक्षेसाठी हे सर्व असल्याने नागरिकांनी त्याला विरोध करु नये असे आवाहनही गोवेकर यांनी केले.
 
असा होतो सेन्टिनल्सचा गुण स्कोअर

नियमभंगाचा प्रकार (फोटोद्वारे माहिती देणे) :
विरोधी दिशेला वाहन चालविणो : 10 गुण
फुटपाथ/ङोब्रा क्रॉसिंगवर पार्किग : 3 गुण
तिहेरी सवारी : 10 गुण
फॅन्सी नंबरप्लेट : 3 गुण
सीट बेल्टशिवाय वाहन चालविणो : 7 गुण
हेल्मेटशिवाय वाहन चालविणो : 7 गुण
काळ्या कांचाची वाहने : 3 गुण

नियमभंगाचा प्रकार (व्हिडिओद्वारे माहिती देणो) :
लालबत्ती तोडणे : 10 गुण
धोकादायक ड्रायव्हींग : 10 गुण
वाहन चालविताना मोबाईल वापरणे: 10 गुण
(वरील प्रकारच्या गुन्हय़ांची फोटो किंवा व्हिडिओद्वारे माहिती दिल्यास सेन्टिनल्सना वरील गुण मिळतात. अशा सेन्टिनल्सना प्रत्येक 100 गुणांमागे 1000 रुपयांचे बक्षिस दिले जाते)
 

Web Title:  Notices to 1.75 lakhs drivers in Goa through Centuries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.