20 कोटी रूपयांच्या कोकेनच्या प्रतिक्षेत असलेल्या नायजेरियन व्यक्तीला गोव्यात अटक

By ऑनलाइन लोकमत on Fri, November 10, 2017 4:03pm

आंतरराष्ट्रीय ड्रग तस्करीमध्ये गोवा हा मुख्य ट्रान्झीट पॉईंट बनत असल्याचं पाहायला मिळतं आहे.

मडगाव- आंतरराष्ट्रीय ड्रग तस्करीमध्ये गोवा हा मुख्य ट्रान्झीट पॉईंट बनत असल्याचं पाहायला मिळतं आहे. आंतरराष्ट्रीय तस्करीशी गोव्याचा संबंध पुन्हा एकदा स्पष्ट झाला आहे. ब्राझीलहून गोव्यात आणल्या जाणाऱ्या 20 कोटींच्या कोकेनची प्रतिक्षा करणाऱ्या एझायकी या नायजेरियन युवकाला एनसीबीच्या पथकाने उत्तर गोव्यातील मोरजी येथून अटक केली आहे.

अटक करण्यात आलेल्या नायजेरियन व्यक्तीकडे गोव्यामध्ये राहण्याची कुठलीही कायदेशीर कागदपत्रं नव्हती. सध्या मुंबई एनसीबीच्या ताब्यात दिलेल्या या नायजेरियनकडे कायदेशीर पासपोर्टही नव्हता असं तपासात समोर आलं आहे. गेल्या आठवड्याच्या सोमवारी मुंबईच्या एनसीबी विभागाने सा पावलो (ब्राझील) येथून इथोपियन एअरलाईन्स विमानातून आलेल्या युरेना माश्रेना या व्हेनानझुयेलाच्या महिलेला अटक केली होती. त्यावेळी तिने बॅगेच्या पोकळीत लपवून आणलेलं 1.84 किलो कोकेन सापडलं होतं. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या कोकेनची किंमत 20 कोटी रुपये होती. या महिलेची चौकशी केली असता,  हा अंमलीपदार्थ गोव्यात पोहोचवायचा असल्याची कबुली दिली.

गोव्यामध्ये डिसेंबर महिन्यात ख्रिसमस सिझन आणि न्यू इयर पार्ट्यांसाठी हे पदार्थ गोव्यात येणार होते. या माहितीवरून एनसीबीने मोरजी येथे एझायकी या नायजेरियन इसमाला अटक केली. 

सध्या या ड्रग रॅकेटमध्ये या एकाच व्यक्तीचा हात आहे की त्याचे आणखी कोणी साथीदार आहेत याचाही तपास केला जात आहे. मागच्या नोव्हेंबर महिन्यात मुंबई पोलिसांनी 60 लाखांचे एलएसडी व 50 लाखांच्या अॅक्टसी टॅबलेटस् पकडल्या होत्या. युरोपहून आलेला हा अंमलीपदार्थ गोव्यात येणार होता असे त्यावेळी पोलीस तपासात पुढे आलं होतं.

संबंधित

गोव्यात भातशेती करपली, यंदा 20 टक्के पिक घटण्याची शक्यता 
गोव्याच्या मुख्यमंत्रीपदासाठी श्रीपाद नाईक यांचे नाव? मात्र विरोधी गटही सक्रिय
आयाराम, गयाराम व घाशीराम! गोव्यातील अस्थिरतेला भाजपाच जबाबदार - उद्धव ठाकरे
नक्षलग्रस्त भागात गांजाची शेती; देशभर तस्करी
मुंबई-गोवा महामार्गावर भक्तांचा प्रवास सुखकर

गोवा कडून आणखी

गोव्यात सत्तेची चावी घटक पक्षांच्याच हाती
गोव्याचा किनारपट्टी व्यवस्थापन आराखडा लांबणीवर पडण्याची शक्यता 
चतुर्थीला महाराष्ट्रातून होते पुरोहितांची आयात 
जिथं सत्ता, तिथं मी, भाजपसोबत राहणार असल्याचे बाबू आजगावकरांचे स्पष्टीकरण
गोव्यात राजकीय उलथापालथ, काँग्रेसकडून सत्ता स्थापनेचा दावा

आणखी वाचा