Mumbai's young killed in tanker and two-wheeler accident in Verna accident | टँकर अन् दुचाकीची धडक, वेर्णा अपघातात मुंबईचा तरुण ठार
टँकर अन् दुचाकीची धडक, वेर्णा अपघातात मुंबईचा तरुण ठार

वास्को: गुरूवारी (दि.६) संध्याकाळी ‘क्वीनीनगर’ वेर्णा येथील राष्ट्रीय चौपदरी महामार्गावर टँकर व दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात दुचाकीच्या मागे बसलेला प्रशांत विश्वासराव हा ३८ वर्षीय तरुण जागीच ठार झाला. अपघातात मरण पावलेला प्रशांत हा मुंबई येथील मूळ रहीवाशी असल्याची माहीती वेर्णा पोलीसांनी देऊन तो गोव्यात नौदलात कामाला असल्याचे सांगितले. सदर अपघातात जखमी झालेल्या दुचाकीस्वारावर गो.मॅ.कॉ इस्पितळात उपचार चालू असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे पोलीसांनी कळविले.

वेर्णा पोलीसांनी दिलेल्या माहीतीनुसार गुरूवारी संध्याकाळी ५.३० वाजता सदर अपघात घडला. प्रशांत त्याच्या साथिदाराच्या ‘एक्टीव्हा’ दुचाकीच्या (क्र: जीए ०७ व्ही ४११२) मागे बसून वेर्णाहून वास्कोच्या दिशेने येत असताना ते ‘क्वीनीनगर जंक्श्नसमोर’ पोचले असता ह्याच बाजूने येणाऱ्या टँकरची (क्र: जीए ०६ टी ४७६९) त्यांच्या दुचाकीला जबर धडक बसली. सदर अपघातात मागे बसलेला प्रशांत दुचाकीवरून फेकला जाऊन टँकरखाली आल्याने तो जागीच ठार झाल्याची माहीती पोलीसांनी दिली. ह्या अपघातात दुचाकी चालवणारा इसमही गंभीर जखमी झाल्याची माहीती पोलीसांनी देऊन अद्याप त्याचे नाव समजलेले नसल्याचे सांगितले. जखमी झालेल्या त्या दुचाकीवर सध्या इस्पितळात उपचार चालू आहे. सदर अपघातानंतर वेर्णा पोलीसांनी टॅकर चालक उत्तपा वसकट्टी याला ताब्यात घेऊन नंतर त्याला अटक केली असल्याची माहीती दिली. पोलीस हवालदार सुरज गोवेकर यांनी सदर अपघाताचा पंचनामा केला असून ह्या प्रकरणाचा अधिक तपास चालू आहे.
 


Web Title: Mumbai's young killed in tanker and two-wheeler accident in Verna accident
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.