सिंधुदुर्गातील उद्योजक, राजकारण्यांची मुंबई-गोवा विमान प्रवासाकडे पाठ

By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2019 01:30 PM2019-01-03T13:30:45+5:302019-01-03T13:37:04+5:30

मुंबई ते गोवा विमानप्रवास केवळ तासाभराचा असला तरी पुढे दाबोळीहून रस्त्याने सिंधुदुर्गात पोचण्यासाठी तब्बल सहा ते सात तास लागत असल्याने सिंधुदुर्गवासीय हा विमानप्रवास टाळू लागले असून खासगी वाहने किंवा एक्सप्रेस रेल्वेगाड्यांनाच पसंती देत आहेत. 

mumbai goa travel by airplane no response | सिंधुदुर्गातील उद्योजक, राजकारण्यांची मुंबई-गोवा विमान प्रवासाकडे पाठ

सिंधुदुर्गातील उद्योजक, राजकारण्यांची मुंबई-गोवा विमान प्रवासाकडे पाठ

Next
ठळक मुद्देसिंधुदुर्गातील बहुतांश बडे व्यापारी, उद्योजक तसेच राजकारणी मुंबई-गोवा प्रवास विमानाने करतात. गेल्या काही महिन्यात दाबोळी ते पणजी वाहनप्रवास हे मोठे अग्निदिव्य ठरले आहे. चिपी विमानतळ सिंधुदुर्गवासीयांसाठी वरदान ठरला असता परंतु या विमानतळाचे उद्घाटन रखडले आहे. 

पणजी - मुंबई ते गोवाविमानप्रवास केवळ तासाभराचा असला तरी पुढे दाबोळीहून रस्त्याने सिंधुदुर्गात पोचण्यासाठी तब्बल सहा ते सात तास लागत असल्याने सिंधुदुर्गवासीय हा विमानप्रवास टाळू लागले असून खासगी वाहने किंवा एक्सप्रेस रेल्वेगाड्यांनाच पसंती देत आहेत. 

सिंधुदुर्गातील बहुतांश बडे व्यापारी, उद्योजक तसेच राजकारणी मुंबई-गोवा प्रवास विमानाने करतात. परंतु गेल्या काही महिन्यात दाबोळी ते पणजी वाहनप्रवास हे मोठे अग्निदिव्य ठरले आहे. या मार्गावर नेहमीच मेगाब्लॉक होत असल्याने वाहने अडकून पडतात. गोव्यापर्यंत विमानप्रवास करुनही सावंतवाडी, कुडाळ, मालवणला वेळेत पोचता येत नाही. दीड ते दोन तासाच्या अंतरासाठी वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागते. अनेकदा विवाह समारंभासाठी येणाऱ्यांचीही धांदल उडते. मुहूर्त टळून गेल्यावर मंडळी पोचते. 

सिंधुदुर्गातील एखाद्या रुग्णाला तातडीच्या वैद्यकीय उपचारांसाठी मुंबईला हलवायचे झाले तर मोठी परवड होते. पणजी-दाबोळी मार्गावर रुग्णवाहिका रस्त्यात अडकून पडण्याचे प्रकार नित्याचेच बनले आहेत. चिपी येथील विमानतळावर गेल्या सप्टेंबरमध्ये ट्रायल घेण्यात आली तरी अजून हा विमानतळ व्यावसायिक विमानांसाठी खुला केलेला नाही. चिपी विमानतळ सिंधुदुर्गवासीयांसाठी वरदान ठरला असता परंतु या विमानतळाचे उद्घाटन रखडले आहे. 

‘चिपी’ची ट्रायल झाली ; परंतु अद्याप सेवा नाही

सिंधुदुर्ग जिल्ह्यात नव्याने तयार झालेल्या चिपी विमानतळावर १२ सप्टेंबर रोजी विघ्नहर्त्या बाप्पासह १२ आसनी विमानाचे आगमन झाले होते. चेन्नईहून या विमानाने उड्डाण घेतले होते. विमानातून गणपतीची मूतीर्ही आणण्यात आली होती. ‘चिपी’वर विमान उतरताच उपस्थित सिंधुदुर्गवासीयांनी टाळ्या वाजवत जोरजोरात घोषणाबाजी करत विमानाचं जल्लोषात स्वागत केले होते. नियमित उड्डाणासाठी लागणाऱ्या सर्व परवानग्या मिळाल्यानंतर हे विमानतळ नियमित उड्डाणासाठी खुले केले जाईल तसेच  एक आंतरराष्ट्रीय विमान कंपनी येथे आठवड्यातून तीन वेळा विमान उतरविणार आहे आणि युरोपमधील अनेक चार्टर्ड विमाने येथे उतरणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. परंतु या गोष्टीला अजून मुहूर्त मिळालेला नाही. दुसरीकडे गोवा-महाराष्ट्र सीमेपासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या ‘मोपा’च्या नियोजित विमानतळाचे कामही संथगतीने चालू आहे

Web Title: mumbai goa travel by airplane no response

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.