गोंधळा गोंधळीच्या वातावरणात मुरगाव नगरपालिका नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षावर अविश्वास ठराव संमत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2019 09:11 PM2019-05-03T21:11:04+5:302019-05-03T21:11:21+5:30

वास्को: मुरगाव नगरपालिकेचे नगराध्यक्ष क्रितेश गावकर व उपनगराध्यक्ष शशिकांत परब यांच्यावर अविश्वास ठराव नोटीस जारी केल्यानंतर शुक्रवारी (दि.३) बैठक ...

Mormugao Nagarpalika municipality president and suburban administrator disbelief resolution passed | गोंधळा गोंधळीच्या वातावरणात मुरगाव नगरपालिका नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षावर अविश्वास ठराव संमत

गोंधळा गोंधळीच्या वातावरणात मुरगाव नगरपालिका नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षावर अविश्वास ठराव संमत

Next

वास्को: मुरगाव नगरपालिकेचे नगराध्यक्ष क्रितेश गावकर व उपनगराध्यक्ष शशिकांत परब यांच्यावर अविश्वास ठराव नोटीस जारी केल्यानंतर शुक्रवारी (दि.३) बैठक बोलवून प्रक्रीयेला सुरवात केल्यानंतर विविध प्रकारचा गोंधळ निर्माण होत शेवटी नगराध्यक्ष क्रितेश व उपनगराध्यक्ष शशिकांत यांच्यावर अविश्वास ठराव संमत झाला. नगराध्यक्ष क्रितेश गावकर यांच्यावर मतदानाद्वारे १२ विरुद्ध ० असा अविश्वास ठराव संमत झाला असून उपनगराध्यक्ष शशिकांत परब यांच्याविरुद्ध १३ नगरसेवकांनी अविश्वास ठरावाच्या बाजूने हात उचलला असून एकही नगरसेवकाने अविश्वास ठरावाच्या विरुद्ध हात उचलला नसल्याने १३ - ० मतांनी ठराव संमत झाला.

मुरगाव नगरपालिकेचे नगराध्यक्ष क्रितेश व उपनगराध्यक्ष शशिकांत यांच्याविरुद्ध काही दिवसापूर्वी नगरसेवक नंदादीप राऊत यांनी अविश्वास ठराव नोटीस जारी केली होती. मुरगाव नगरपालिकेत २५ नगरसेवक असून आपल्याबरोबर अन्य १२ नगरसेवकांची अविश्वास ठराव नोटीसीला सहमती असल्याचे राऊत यांनी नमूद केल्यानंतर शुक्रवारी (दि.३) याबाबत निर्णय जाणून घेण्यासाठी बैठक बोलवली होती. शुक्रवारी सकाळी ह्या बैठकीला सुरवात झाली असता शक्षांक त्रिपाठी निर्वाचन अधिकारी म्हणून उपस्थित होते. तसेच त्यांच्याबरोबर मडगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी सिद्धीविनायक नाईक यांची उपस्थिती होती. मुरगाव नगरपालिकेतील २५ नगरसेवकांपैकी सारीका पालकर वगळता इतर सर्वांची ह्या बैठकीला उपस्थिती होती. बैठकीला सुरवात झाल्यानंतर नार्वाचन अधिकाऱ्यांनी कोणाला ह्या अविश्वास ठरावाच्या बैठकीला बोलायचे असल्यास वेळ दिली असता नगराध्यक्ष क्रितेश यांनी मागच्या सहा महीन्यात त्यांच्या कार्कीदीत कशा प्रकारे विकास केला आहे याची माहीती ठेवली. यानंतर अविश्वास ठरावाबाबत निर्णय जाणून घेण्यासाठी हात उचलून मतदान करण्याचा प्रस्ताव निर्वाचन अधिकाऱ्यांने समोर ठेवला असता नगराध्यक्ष क्रितेश व त्यांचे समर्थक नगरसेवकांनी यास विरोध करून गुप्त मतदानाद्वारे ही प्रक्रिया करण्याबाबत मागणी पुढे ठेवली. याबाबत विचार करण्यासाठी काही वेळ दिला तरीसुद्धा क्रितेश व त्यांच्यासमर्थकांनी मतदानाचीच मागणी पुढे ठेवल्यानंतर नगराध्यक्षावर दाखल केलेल्या अविश्वास ठरावाचा निर्णय जाणून घेण्यासाठी मतदान करण्यात आले. मतदान प्रक्रियेला सुरवात झाल्यानंतर क्रितेश गावकर तसेच त्यांचे समर्थक नगरसेवक शशिकांत परब, दामू कास्कर, मुरारी बांदेकर, लीयो रॉड्रीगीस, धनपाल स्वामी, सैफुल्ला खान, कृष्णा साळकर, लवीना डी’सोझा, रोचना बोरकर व पाश्कॉल डी’सोझा यांनी मतदानात भाग घेण्यास नकार दिल्याने बैठकीच्या काळात याबाबत सर्वात आर्श्चय व्यक्त करण्यात आले. सदर बैठकीत उपस्थित असलेल्या अन्य १३ नगरसेवकांनी ह्या काळात मतदान केले. नगराध्यक्षावर दाखल करण्यात आलेल्या अविश्वास ठरावाचा निर्णय काय हे जाणून घेण्यासाठी नंतर मतांची मोजणी करण्यात आली असता अविश्वास ठरावाच्या बाजूने १३ मते असल्याचे स्पष्ट झाले.

क्रितेश यांच्या समर्थक नगरसेवकांनी मतदान केले नसल्याने विरुद्धचा आकडा शून्य राहीला. यावेळी क्रितेश गावकर यांनी आपल्याला मते तपासायची आहेत अशी मागणी केली असता त्यांना याची परवानगी देण्यात आली. तपासणीच्या दरम्यान एका नगरसेवकाने मतदानासाठी ठेवलेल्या ‘पॅन’ चा वापर न करता दुसºया पॅन ने मतदान केल्याचे क्रितेश यांनी निर्वाचन अधिकाºयाच्या नजरेस आणल्यानंतर सदर मत अवैद्य असल्याचे निर्वाचन अधिकाºयांने सांगून अविश्वास ठराव १२ - ० मताने संमत झाल्याचे घोषीत केले. अविश्वास ठराव संमत व्हायला बहुमत मते असायला पाहीजे अशी बाजू क्रितेश यांनी याप्रसंगी ठेवण्यास सुरवात केली. निर्वाचन अधिकाºयांने तात्पुरता हा विषय बाजूला ठेवून उपनगराध्यक्षवरील अविश्वास ठरावाचा निर्णय जाणून घेण्यासाठी हात उंचावून मतदान करण्याबाबत सांगितले असता पुन्हा गावकर व त्याच्या समर्थक नगरसेवकांनी मतदानाची मागणी केली. नगराध्यक्षावरील अविश्वास ठराव जाणून घेण्यासाठी तुमच्या मागणीवरून मतदान केले असता तुम्हीच यात सहभाग घेतला नसल्याचे निर्वाचन अधिकाºयांने स्पष्ट करून नंतर याबाबत हात उंचवून निर्णय जाणून घेण्याचे ठरविले. यावेळी उपनगराध्यक्षावर दाखल केलेल्या अविश्वास ठरावाच्या बाजूने १३ नगरसेवकांनी हात वर केला तर ह्या ठरावाच्या विरोधातील मते जाणून घेण्यास निर्वाचन अधिकाºयांनी मागितले असता क्रितेश व त्यांच्या समर्थकांनी ह्या मतदान प्रक्रियेचा आम्ही विरोध करत असल्याचे सांगून हात वर केले नाहीत. यानंतर उपनगराध्यक्ष शशिकांत परब यांच्याविरुद्ध १३ - ० मतांनी अविश्वास ठराव संमत झाल्याचे घोषीत करण्यात आले.

निवडणूकीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सुद्धा सुमारे दिड तास नगराध्यक्षावरील ठराव संमत झाला की नाही याबाबतचा सवाल येथे उपस्थित असलेल्यांत राहीला. निर्वाचन अधिकारी शक्षांक त्रिपाठी तसेच त्यांना सहयोग करत असलेले अधिकारी सिद्धीविनायक नाईक यांनी बराच वेळ मुरगाव नगरपालिका मुख्याधिकारी कार्यालयात बसून विविध प्रकारचा अभ्या ह्या विषयावर केला. सुमारे दिड तासाच्या अभ्यासानंतर शक्षांक त्रिपाठी यांनी कार्यालयातून बाहेर येऊन नगराध्यक्ष क्रितेश गावकर यांच्यावर १२ - ० मतांनी अविश्वास ठराव संमत झाल्याची माहीती पत्रकारांना दिली. अविश्वास ठरावाच्या बाजूने १३ मते होती, मात्र यापैंकी एका नगरसेवकांने दुसºया पेन चा वापर करून मतदान केल्याने ते मत अवैद्य ठरवण्यात आल्याची माहीती निर्वाचन अधिकाºयांनी याप्रसंगी दिली. आज घेण्यात आलेल्या ह्या बैठकीचे पूर्ण इतिवृत्त आपण पालिका संचालकांना पाठवून देणार अशी माहीती त्यांनी याप्रसंगी पत्रकारांना दिली. नगराध्यक्षावर अविश्वास ठराव संमत झाल्याचे निर्वाचन अधिकाºयांनी सांगितल्यानंतर याच्याविरुद्ध आपण न्यायालयात जाणार असे क्रितेश यांनी पत्रकारांना सांगितले. अविश्वास ठराव संमत करण्यासाठी बहुमत नगरसेवकांचा पाठींबा असणे गरजेचे असून मुरगाव नगरपालिकेत हा आकडा १३ चा असल्याचे सांगितले. आपल्याविरुद्ध अविश्वास ठरावाचा आकडा १२ झालेला असून तरी सुद्धा अविश्वास ठराव संमत झाल्याचे घोषीत केल्याने आपण न्यायालयात जाणार अशी माहीती त्यांनी दिली. तसेच उपनगराध्यक्षाच्या मतदानाबाबत सुद्धा आपण न्यायालयात जाणार असेही संकेत गावकर यांनी दिले.

शुक्रवारी मुरगाव पालिकेत भाजप विरुद्ध भाजप झाल्याचे दिसून आले

नगराध्यक्ष क्रितेश गावकर व उपनगराध्यक्ष शशिकांत परब भाजपचे नेते असण्याबरोबरच नगरविकासमंत्री मिलींद नाईक यांचे एकदम जवळचे समर्थक आहेत. यांच्यावर अविश्वास ठरावाची नोटीस दाखल करण्यारे नगरसेवक भाजपचे आमदार कार्लुस आल्मेदा यांचे समर्थक असून सदर अविश्वास ठारावाच्या बाजूने उभे राहीलेले जास्तित जास्त नगरसेवक सुद्धा भाजपचेच असल्याने मुरगाव नगरपालिकेत शुक्रवारी भाजप विरुद्ध भाजप युद्ध पाहण्यास मिळाले. क्रितेश व शशिकांत यांच्यावर अविश्वास ठराव संमत करण्यासाठी भाजप आमदार आल्मेदा यांच्या समर्थकांना अन्य नगरसेवकांचा सुद्धा पाठींबा जरी मिळाला तरी भाजपच्याच समर्थकांनी भाजपच्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षांवर अविश्वास ठराव संमत करण्यास पुढाकार घेतल्याने येथील भाजपच्या वरिष्ठ नेत्यात सर्वकाही ठिक नसल्याचे जाणवते.

Web Title: Mormugao Nagarpalika municipality president and suburban administrator disbelief resolution passed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा