खाण घोटाळा : दिगंबर कामतच्या अटकेसाठी एसआयटीचा आटापिटा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2017 08:44 PM2017-11-19T20:44:14+5:302017-11-19T20:45:30+5:30

Mining scam: SIT's attempt to arrest Digambar Kamath | खाण घोटाळा : दिगंबर कामतच्या अटकेसाठी एसआयटीचा आटापिटा

खाण घोटाळा : दिगंबर कामतच्या अटकेसाठी एसआयटीचा आटापिटा

Next

 पणजी -  खनिज घोटाळा प्रकरणात माजी मुख्यमत्री दिगंबर कामत यांच्या अटकेसाठी विशेष तपास पथकाचा ससेमिरा लागला असून अजून त्यांचा पत्ता एसआयटीला लागला नाही.  

प्रफूल्ल हेदे खाण लिज प्रकरणात अंतरीम अटकपूर्व जामीन न मिळाल्यामुळे अडचणीत आलेले दिगंबर कामत याच्या अटकेसाठी एसआयटीचे प्रयत्न सुरू असून रविवारी एसआयटीकडून त्यांचा ठावा ठिकाणा हुडकून काढण्यासाठी मडगाव आणि मडगावबाहेरही खूप शोधाशोध केली. मोईल टॉवर लॉकेशन, जिपीएस लॉकेशन आणि इतर मार्गानेही त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न पोलिसांकडून करण्यात आला. सूत्त्रांकडून मिळालेल्या माहितीुसार यासाठी कामत यांच्या जवळच्या माणसांचाही वापर करण्याचा प्रयत्न एसआयटीकडून करण्यात आला. परंतु कामत यांचा पत्ता त्यांना काही मिळाला नाही. एसआयटीची सर्व मेहनत व्यर्थ गेली. एसआयटीच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कामत यांच्या मडगाव येथील निवासस्थानी ते नाही आहेत. 
दरम्यान कामत हे अटक चूकविण्यासाठी लपून आहेत. ते तपासकार्यात सहकार्य करीत नाहीत असा दावा एसआयटीने केला आहे. सोमवारी पणजी  सत्र न्यायालयात त्यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी हौणार आहे. या अर्जाला आक्षेप घेताना एसआयटीकडूनही नेमका हाच  युक्तिवाद केला जाण्याची शक्यता आहे. कामत यांचा मोबाईल फोन बंद मिळत असल्याचे एसआयटीचे म्हणणे आहे. खाण खात्याचे माजी प्रधान स चिव राजीव यदुवंशी यांनी दिलेल्या कामत यांच्या विरोधातील जबानीनंतर अडचणीत आलेले कामत यांनी लगेच प्रफुल्ल हेदे प्रकरणातही अटकपूर्व जामीनसाठी अर्ज केला होता. 
दरम्यान प्रफल्ल हेदे यांनाही एसआयटीकडून चौकशीसाठी पुन्हा समन्स बजावला जाणार आहे. यापूर्वीही त्यांना बौलावण्यात आले नव्हते. परंतु विशिष्ट कारण देऊन ते हजर राहिले नव्हते.

Web Title: Mining scam: SIT's attempt to arrest Digambar Kamath

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.