म्हादई वॉटर राफ्टिंग, ‘सांजाव’ पर्यटकांचे आकर्षण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2018 02:05 PM2018-06-21T14:05:12+5:302018-06-21T17:36:18+5:30

गोव्यात पावसाळी पर्यटनासाठी जीटीडीसीचे वेगवेगळे उपक्रम 

Mhadai Water Rafting, 'Sanjav' Tourist Attractions | म्हादई वॉटर राफ्टिंग, ‘सांजाव’ पर्यटकांचे आकर्षण

म्हादई वॉटर राफ्टिंग, ‘सांजाव’ पर्यटकांचे आकर्षण

googlenewsNext

पणजी : पावसाळी पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी गोव्यात येणा-या पर्यटकांना म्हादई नदीतील वॉटर राफ्टिंग तसेच ‘सांजाव’ आकर्षण ठरत आहे.  पावसाची दणक्यात सुरवात झाल्याने आणि म्हादईला पुरेसे पाणी आल्याने येत्या आठवड्यात  वॉटर राफ्टिंग सुरु होईल. याशिवाय २४ जून रोजी साजरा होणा-या ‘सांजाव’निमित्त गोवा पर्यटन विकास महामंडळाने विशेष जलसफरींसह अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. 

म्हादई नदीत दरवर्षी जून ते सप्टेंबर या कालावधीत आयोजित करण्यात येणारे व्हाइट वॉटर राफ्टिंग येत्या आठवड्यात सुरु होणार आहे. पावसाळ्यात पर्यटकांसाठी हेदेखिल एक मोठे आकर्षणच असते. पावसाळी साहसी उपक्रम म्हणून याकडे पाहिले जाते. वर्षा ऋतूचे दणक्यात आगमन झाले असून मन प्रसन्न करणा-या पावसात भिजण्याची आणि म्हादई खो-यातील वन्यप्राण्यांचे दर्शन घेण्याची तसेच दाट जंगलातून, खळाळत्या नदीतल्या भोव-यांची सैर करण्याची मजा यातून लुटता येते. 

एकावेळेस सात राफ्ट्स नदीत घातल्या जातात. ही थरारक सहल १० किलोमीटरची असून थक्क करायला लावणा-या निसगार्चे रूप पाहताना भावना उचंबळून येतात. म्हादई नदीच्या मोठ्या व खळाळत्या पात्रात मित्रपरिवार तसेच कुटुंबासोबत या सहलीचा मनसोक्त आनंद घेता येतो. एकावेळेस प्रशिक्षित मार्गदर्शकासह किमान सहा प्रवासी यात सहभागी होऊ शकतात. 

व्हाइट वॉटर राफ्टिंग उपक्रम आंतरराष्ट्रीय नियमांनुसार राबवला जातो. प्रशिक्षकांना योग्य प्रशिक्षण देण्यात आले असून हा उपक्रम सुरक्षेला प्रथम प्राधान्य देत राबवला जातो. प्रत्येक प्रवाशाला तज्ज्ञांकडून माहितीपर सत्र आणि त्यानंतर लाइफ जॅकेट्स, पॅडल्स हे साहित्य दिले जाते. निघण्याआधी सुरक्षा व इतर प्रक्रियांची माहिती देणे बंधनकारक असते. प्राथमिक अनुभव घेणाºयांसाठी तसेच १२ वषार्पुढील मुलांसाठी ही सहल योग्य आहे. सुरक्षित पादत्राणे आणि योग्य कपडे घालणे बंधनकारक असते. 

‘सांजाव’चा कार्यक्रम

२४ रोजी येथील सांतामोनिका जेटीवरुन सकाळी १0.३0 ते दुपारी ३.३0 या वेळेत पर्यटकांना बोटींमधून जलसफरींचा आनंद लुटता येईल. याशिवाय ‘फेस्ताचो राजा आणि फेस्ताची राणी’ स्पर्धा, नारळ फोडण्याची स्पर्धा, फळ आणि फुलांच्या अभिनव स्पर्धा, सांजांव फेस्ट ट्रिव्हिया, फिफा जागतिक चषक प्रश्नमंजुषा आदी स्पर्धा घेतल्या जातील. याशिवाय बोटींवर नृत्याचे कार्यक्रमही होतील. विजेत्यांना हॉलिडे पॅकेज, डिनर व्हाउचर आदी आकर्षक बक्षीसे दिली जातील. दांपत्यासाठी २२५0 रुपये, एका व्यक्तीसाठी १३00 रुपये, ५ ते १२ वर्षांपर्यंतच्या मुलांना ६५0 रुपये शुल्क आहे. 

गोव्यात ‘सांजाव’चा कार्यक्रम ख्रिस्ती बांधव मोठ्या आनंदाने साजरा करतात. पावसाळ्यात विहिरी, नद्या, नाले तुडुंब भरलेले असतात. डोक्यावर फुलांचा साज चढवून पाण्याने तुडुंब भरलेल्या विहिरींमध्ये उड्या घेऊन ‘सांजांव’ साजरा केला जातो. 

पावसाळ्यात वेगवेगळे उपक्रम : काब्राल 

पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष आमदार निलेश काब्राल म्हणाले की, पावसाळी पर्यटनासाठी महामंडळाकडून वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येत असून त्याला पाहुण्यांचा उत्स्फूर्त प्रतिसादही लाभत आहे. सध्या मान्सूनमध्ये किना-यांवर पोहण्यासाठी मनाई आहे. पर्यटकांनी इशा-यांचे पालन करायला हवे. वॉटर राफ्टिंग तसेच अन्य साहसी उपक्रमांच्या बाबतीत पर्यटकांच्या सुरक्षेची पूर्ण काळजी घेतली जाते.

Web Title: Mhadai Water Rafting, 'Sanjav' Tourist Attractions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.