म्हादई वॉटर राफ्टिंग येत्या २८ पासून, गोवा पर्यटन विकास महामंडळाकडून घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2018 12:08 PM2018-06-27T12:08:20+5:302018-06-27T12:08:32+5:30

पावसाळी पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी गोेव्यात येणाऱ्या पर्यटक ज्याची आतुरतेने वाट पाहत होते तो म्हादई नदीतील वॉटर राफ्टिंगचा थरार येत्या २८ पासून अनुभवता येणार आहे.

Mhadai water rafting announced from 28th, Goa Tourism Development Corporation | म्हादई वॉटर राफ्टिंग येत्या २८ पासून, गोवा पर्यटन विकास महामंडळाकडून घोषणा

म्हादई वॉटर राफ्टिंग येत्या २८ पासून, गोवा पर्यटन विकास महामंडळाकडून घोषणा

Next

पणजी : पावसाळी पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी गोेव्यात येणाऱ्या पर्यटक ज्याची आतुरतेने वाट पाहत होते तो म्हादई नदीतील वॉटर राफ्टिंगचा थरार येत्या २८ पासून अनुभवता येणार आहे. सप्टेंबरपर्यंत म्हादईत वॉटर राफ्टिंग चालणार आहे. पर्यटन विकास महामंडळाने बुधवारी हे जाहीर केले.
पहिली फेरी सकाळी ९.३0 वाजता आणि दुसरी फेरी दुपारी २.३0 वाजता होईल. १0 किलोमीटरचा हा थरारक प्रवास अडीच ते तीन तासांचा असेल आणि पर्यटकांना त्याचा आनंद लुटता येईल.

या थरारक वॉटर राफ्टिंगच्या दरम्यान पर्यटकांच्या सुरक्षेची आवश्यक ती सर्व काळजी घेण्यात येत आहे. वैशिष्ट्य म्हणजे प्रथमच या थरारक प्रवासाचे व्हिडीओ चित्रीकरण केले जाणार असून पर्यटकांना हे चित्रीकरण वॉटसअप किंवा गुगल ड्राइव्हवर उपलब्ध होईल. पणजीहून वाळपईपर्यंत जाण्यासाठी बसची व्यवस्था करण्यात आली असून दरडोई २00 रुपये आकारले जातील. गोवा पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष आमदार नीलेश काब्राल म्हणाले की, हे व्हिडीओ चित्रीकरण पर्यटकांना उपलब्ध होणार असल्याने या थरारक प्रवासाच्या आठवणी हे पर्यटक स्वत:बरोबर घेऊन जातील. दहा वर्षांपेक्षा अधिक वयाच्या सर्वांना वॉटर राफ्टिंगमध्ये भाग घेता येईल. योग्य ती पादत्राणे तसेच व प्रवासाच्यावेळी योग्य ते कपडे परिधान करण्याची अट आहे. ५ टक्के जीएसटीसह या थरारक प्रवासासाठीचे भाडे दरडोई १८९0 रुपये एवढे आहे.

पावसाळ्यात पर्यटकांसाठी हेदेखील एक मोठे आकर्षणच असते. पावसाळी साहसी उपक्रम म्हणून वॉटर राफ्टिंगकडे पाहिले जाते. वर्षा ऋतूचे दणक्यात आगमन झाले असून मन प्रसन्न करणा-या पावसात भिजण्याची आणि म्हादई खो-यातील वन्यप्राण्यांचे दर्शन घेण्याची तसेच दाट जंगलातून, खळाळत्या नदीतल्या भोव-यांची सैर करण्याची मजा यातून लुटता येते. व्हाइट वॉटर राफ्टिंग उपक्रम आंतरराष्ट्रीय नियमांनुसार राबवला जातो. प्रशिक्षकांना योग्य प्रशिक्षण देण्यात आले असून हा उपक्रम सुरक्षेला प्राधान्य देत राबवला जातो. प्रत्येक प्रवाशाला तज्ज्ञांकडून माहितीपर सत्र आणि त्यानंतर लाइफ जॅकेट्स, पॅडल्स हे साहित्य दिले जाते.

Web Title: Mhadai water rafting announced from 28th, Goa Tourism Development Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा