Last year, 2,447 chapter cases were registered in South Goa | दक्षिण गोव्यात मागच्या वर्षी 2,447 चॅप्टर केसेसची नोंद
दक्षिण गोव्यात मागच्या वर्षी 2,447 चॅप्टर केसेसची नोंद

मडगाव:  दक्षिण गोव्यात मागच्या वर्षी एकूण 2,447 चॅप्टर केसीसची नोंद झाली आहे. फौजदारी दंड संहितेच्या कायदयाखाली पोलिसांनी ही प्रकरणो नोंदवून घेतली आहे. 107 कलमाखाली 1,303 प्रकरणो नोंदविली आहे. संशयिताकडून गुन्हा घडण्याची शक्यता असल्याने खबरदारी म्हणून पोलिसांनी वरील जणांवर गुन्हा नोंद करुन त्यांच्यावर कारवाई केलेली आहे.


फोंडा पोलिसांनी सर्वात जास्त म्हणजे 240 प्रकरणे नोंदविलेली आहे. त्यानंतर कोलवा पोलीस ठाण्याचा क्रमांक लागत आहे. या ठाण्यात 219 प्रकरणो नोंद आहेत. तर वास्को पोलीस ठाण्यात 125 प्रकरणे आहेत. विमानतळ पोलीस ठाण्यातही 25 जणांवर कारवाई करण्यात आली आहे.


कलम 109 अंर्तगत चांगल्या वर्तणुकीच्या हमी घेण्यात आली आहे. फोंडा पोलीस ठाण्यात एकूण 240 तर वास्कोत 127 जणांकडून अशी हमी घेण्यात आली आहे. सांगे व कुळे पोलीस ठाण्याची पाटी मात्र याबाबत कोरी आहे. सवयी गुन्हेगार (हॅब्युचल ऑफेन्डर्स) खाली 80 जणांवर कारवाई केली आहे. वास्को पोलीस ठाण्यात यात 50 जणांचा समावेश आहे तर कुडचडे पोलीस ठाण्यात 16 जणांचा समावेश आहे. मायणा - कुडतरी, कुंकळळी, केपे, सांगे, वेर्णा, मुरगाव व कुळे येथे मात्र अशा प्रकरणांची नोंद नाही.


गडबडी करण्याची शक्यता असल्याच्या कारणावरुन दक्षिण गोव्यातील विविध पोलीस ठाण्यात मागच्या वर्षी 43 प्रकरणो नोंदवून घेतली यात वास्को पोलीस ठाण्यात 13 तर  फोंडा व कुडचडे येथे प्रत्येकी चार प्रकरणो नोंद झाली आहे. सांगे, काणकोण व कुळे येथे मात्र अशा प्रकरणाची नोंद नाही.


शांतता भंग प्रकरणाची 64 प्रकरणो झालेली आहे. यात फोंडा येथे पंधरा, नंतर मायणा कुडतरी येथे नउ तर मडगाव पोलीस ठाण्यात आठ प्रकरणांचा समावेश आहे. फातोर्डा व काणकोण येथे मात्र अशी प्रकरणांची नोंद नाही.
 


Web Title: Last year, 2,447 chapter cases were registered in South Goa
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.