कर्नाटकने गोव्याला भाजी, दूध पुरवठा बंद केल्यास महाराष्ट्रातून मागवू - शिवसेना

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2018 06:30 PM2018-01-16T18:30:14+5:302018-01-16T18:44:11+5:30

म्हादईच्या प्रश्नावर कर्नाटकने गोव्यात येणारी भाजी, दूध बंद केले तर शिवसेना महाराष्ट्रातून या वस्तू मागवून लोकांना पुरवठा करील, असे स्पष्ट करण्यात आले.

Karnataka should ask for Maharashtra's ban on vegetable and milk supply - Shiv Sena | कर्नाटकने गोव्याला भाजी, दूध पुरवठा बंद केल्यास महाराष्ट्रातून मागवू - शिवसेना

कर्नाटकने गोव्याला भाजी, दूध पुरवठा बंद केल्यास महाराष्ट्रातून मागवू - शिवसेना

googlenewsNext

पणजी - म्हादईच्या प्रश्नावर कर्नाटकने गोव्यात येणारी भाजी, दूध बंद केले तर शिवसेना महाराष्ट्रातून या वस्तू मागवून लोकांना पुरवठा करील, असे स्पष्ट करण्यात आले. सार्वमतदिन सरकारी पातळीवर साजरा करण्याचे पाऊल तसेच जनमत कौलाचे जनक जॅक सिक्वेरा यांचा पुतळा विधानसभा संकुलात बसविण्याच्या हालचाली हा जातीय राजकारणाचा भाग असल्याचा आरोप करण्यात आला. 

पत्रकार परिषदेत शिवसेना राज्यप्रमुख शिवप्रसाद जोशी म्हणाले की, सिंधुदुर्ग, गोवा, कारवार अशा विशाल गोमंतकाची मागणी या घडीला केली तर नवल वाटू नये. म्हादईच्या प्रश्नावर कर्नाटकची दादागिरी सहन केली जाणार नाही, असे उत्तर जिल्हा प्रमुख किशोर राव यांनी सांगितले. 

 १0 हजार सदस्य नोंदणीचा दावा 

गोव्यात शिवसेनेने येत्या २३ रोजी बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीपासून वेगवेगळे उपक्रम हाती घेण्यात येणार असल्याचे व त्यानंतर पक्षाचे अधिवेशनही होणार असल्याचे जाहीर केले आहे. राज्यात पक्षाची १0 हजार सदस्य नोंदणी झालेली आहे तर ३ हजार सक्रीय कार्यकर्ते असल्याचा दावा राज्यप्रमुख शिवप्रसाद जोशी यांनी केला.

पभकार परिषदेत जोशी यांनी अशी माहिती दिली की,  बाळासाहेबांच्या जयंतीदिनापासून जनसंपर्क अभियान हाती घेतले जाणार आहे. पक्षाची ध्येय धोरणे, आचार विचार, संस्कार लोकांपर्यंत पोचविले जातील. ४ मार्च रोजी शिवजयंतीपर्यंत हे अभियान चालू राहील. मधल्या काळात राज्य अधिवेशनही भरविण्यात येईल. केंद्रीय उद्योगमंत्री अनंत गीते तसेच सेनेचे अन्य केंद्रीय नेते यात सहभागी होतील. बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त शिवसैनिक  प्रत्येक सरकारी शाळेला भेट देतील आणि शाळेची डागडुजी करायची असल्यास ती करतील. शिक्षक तसेच विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतील. जनसंपर्क अभियानाव्दारे किमान पाच हजार लोकांपर्यंत पोचण्याचा मानस आहे. 

 वृध्दाश्रम हवेतच कशाला? 

वृध्द आई, वडिलांना वृध्दाश्रमांमध्ये पाठवण्याचे प्रकार वाढले आहेत त्याबाबत चिंता व्यक्त करताना जोशी म्हणाले की, शिवसैनिक अशा वृध्दांच्या पुत्रांची भेट घेऊन त्यांना परत घरी आणावे, अशी विनंती करतील. आई, वडिलांची सेवा करण्याची संधी अभावानेच मिळते. आपल्या माता पित्यांवर कोणी असा अन्याय करु नये, असे आवाहन करताना वृध्दाश्रम हवेतच कशाला?, असा सवाल जोशी यांनी केला. महिला आश्रमांनाही अशीच भेट देऊन त्यांचेही प्रबोधन केले जाईल. 

पत्रकार परिषदेस सेनेचे पदाधिकारी विनोद तळेकर, एकनाथ नाईक आदी उपस्थित होते. 

Web Title: Karnataka should ask for Maharashtra's ban on vegetable and milk supply - Shiv Sena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.