IPS Sunil Gargav in the case of bribery case will be decided on 8th | लाचखोरी प्रकरणातील आयपीएस सुनील गर्गवर यांचा निर्णय लागणार 8 रोजी

पणजी- लाचखोरी प्रकरणानंतर गोव्यातून दिल्ली येथे बदली करण्यात आलेले आयपीएस अधिकारी पोलीस महानिरीक्षक सुनील गर्ग यांच्यावरील निवाडा आता ८ जानेवारी रोजी होणार आहे. न्यायाधीशांनी अर्ध्या दिवसाची सुट्टी घेतल्यामुळे हे प्रकरण पुढे ढकलण्यात आले आहे.
गर्ग यांच्याविरुद्ध गुन्हा न नोंदविण्याची मागणी करणारे तक्रारदार मुन्नालाल हलवाई यांनी न्यायालयात दाखल केलेल्या अर्जावर सुनावणी पूर्ण होऊन प्रकरण निवाड्यासाठी ठेवण्यात आले होते. मंडळवारी त्यावर निवाडा होणार होता. परंतु प्रकरण संध्याकाळी होते आणि संध्याकाळच्या सत्रात हे प्रकरण हाताळणाºया न्यायाधीश सुट्टीवर गेल्या होत्या. निवाडा पुढे ढकलला असला तरी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरलेल्या या प्रकरणात न्यायालया काय कौल देईल याकडे सर्वांचे लक्ष्य आहे.
महानिरीक्षक सुनील गर्ग याने गुन्हा नोंदविण्याचा आदेश देण्यासाठी ५ लाख रुपये लाच मागितल्याचा गंभीर आरोप मुन्नालाल हलवाई या नागरिकाकडून करण्यात आला होता. केवळ आरोप केला नव्हता तर लाच देण्याच्या प्रकरणात गर्ग यांचे व्हिडिओ रेकॉर्डिंगही करण्यात आले होते आणि त्यांचे संभाषणही टीपण्यात आले होते. हे पुरावे सादर करून तक्रारही करण्यात आली होती. परंतु त्याच्या विरुद्ध गुन्हा नोंदविण्याऐवजी त्याला गोव्यातून दिल्ली येथे बदली करण्यात आली होती. त्याच्या विरुद्ध गुन्हा नोंद व्हावा यासाठी तक्रारदाराने पणजी सत्र न्यायालयात अर्ज केला होता. आपल्याविरुद्धची याचिका रद्द करण्यात यावी यासाठी गर्ग यांनी केलेली याचिका न्यायालयाने फेटाळली होती. मुंबई उच्च न्यायालयाच्या पणजी खंडपीठानेही त्याना दिलासा दिला नव्हता.