‘आयएनएसव्ही तारीणी’ केप टाऊन बंदरात; नौदल महिला अधिका-यांनी साजरी केली रंगपंचमी 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2018 06:17 PM2018-03-02T18:17:43+5:302018-03-02T18:17:43+5:30

गोव्यातून गेल्या सप्टेंबरमध्ये जगभ्रमंतीवर निघालेली सहा महिला नौदल अधिका-यांचा समावेश असलेली ‘आयएनएसव्ही तारीणी’ही शिडाची बोट शुक्रवारी दक्षिण आफ्रिकेच्या केप टाऊन बंदरात पोचली. तेथे महिला नौदल अधिका-यांनी एकमेकांना रंग लावून रंगपंचमीही उत्साहाने साजरी केली.

'INS Sunshine' in Cape Town harbor; Naval women officials celebrated the festival of colors | ‘आयएनएसव्ही तारीणी’ केप टाऊन बंदरात; नौदल महिला अधिका-यांनी साजरी केली रंगपंचमी 

‘आयएनएसव्ही तारीणी’ केप टाऊन बंदरात; नौदल महिला अधिका-यांनी साजरी केली रंगपंचमी 

Next

पणजी : गोव्यातून गेल्या सप्टेंबरमध्ये जगभ्रमंतीवर निघालेली सहा महिला नौदल अधिका-यांचा समावेश असलेली ‘आयएनएसव्ही तारीणी’ही शिडाची बोट शुक्रवारी दक्षिण आफ्रिकेच्या केप टाऊन बंदरात पोचली. तेथे महिला नौदल अधिका-यांनी एकमेकांना रंग लावून रंगपंचमीही उत्साहाने साजरी केली.

स्वदेशी बनावटीच्या छोट्याशा शिडाच्या बोटीवर स्वार होऊन या महिला अधिकारी ‘नाविका सागर परिक्रमा’ अंतर्गत जग भ्रमंतीसाठी निघाल्या आहेत. हा जगप्रवास पूर्ण करुन एप्रिल २0१८ मध्ये हे पथक गोव्यात परतणार आहे. या नौकेने आतापर्यंत १५,५00 नॉटिकल मैल अंतर पार केले आहे. गोव्याहून १0 सप्टेंबर २0१७ रोजी ही बोट निघाली होती. २५ सप्टेंबर रोजी या नौकेने विषुववृत्त पार केले. त्यानंतर केप ल्युवीन बंदरात ९ नोव्हेंबर आणि केप हॉर्न बंदरात १९ जानेवारी रोजी ही नौका पोचली तेथून पुढील प्रवास करीत आता केप टाऊन बंदरात दाखल झाली असल्याचे नौदलाने निवेदनात म्हटले आहे. वाटेत अनेकदा खराब हवामानाला तोंड द्यावे लागले. ७ मिटरपर्यंत उंचीच्या लाटा तसेच ताशी ६0 किलोमिटर वा-याच्या प्रचंड वेगाचाही सामना करावा लागला. 

दक्षिण आफ्रिकेतील केप टाऊन हे या भ्रमंतीतील अखेरचे बंदर आहे. या महिन्यातच तेथून ही बोट परतीच्या प्रवासाला निघणार आहे. या महिला नौदल अधिकारी १६५ दिवसात २१,६00 सागरी मैल अंतराचा प्रवास करणार आहेत. आशियातील महिलांचा समुद्री मार्गाने पृथ्वी परिक्रमा करण्याची ही पहिलाच प्रयत्न असून यासाठी गेल्या दोन वर्षांपासून तयारी चालू होती. महिला अधिका-यांच्या या चमूमध्ये लेफ्टनंट कमांडर वर्तिका जोशी, लेफ्टनंट कमांडर प्रतिभा जामवाल, लेफ्टनंट कमांडर पद्रपल्ली स्वाती, लेफ्टनंट ऐश्वर्या बोध्दापती, लेफ्टनंट शोरगप्पन् विजया, लेफ्टनंट पायल गुप्ता यांचा समावेश आहे. 

आॅस्ट्रेलिया, न्युुझीलंड, फॉकलँड आणि दक्षिण आफ्रिकेत मिळून चार बंदरांवर या बोटीने थांबे घेतले. ‘आयएनएसव्ही तरीणी’ बोट ५५ फूट लांबीची असून गोव्यातच अ‍ॅक्वारिस शिपयार्डने ती बांधली आहे. या समुद्री जगप्रवासात बोटीवरील नौदल महिला अधिका-यांनी समुद्रातील जैव विविधता, पर्यावरण याचा अनुभव घेतला. सागरी प्रदूषणावर हे पथक अभ्यास करणार आहे. 

Web Title: 'INS Sunshine' in Cape Town harbor; Naval women officials celebrated the festival of colors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.