इफ्फीचे अ‍ॅप गुंडाळले, प्रतिनिधी वैतागले

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2018 04:15 PM2018-11-21T16:15:29+5:302018-11-21T16:15:42+5:30

गोव्यात सुरु असलेल्या ४९ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी लाँच केलेले अ‍ॅप सुरु होण्याचे नाव घेत नसल्यामुळे आलेले जगभरातील प्रतिनिधी वैतागले आहेत.

Iffi's app wrapped up, the delegation would wait | इफ्फीचे अ‍ॅप गुंडाळले, प्रतिनिधी वैतागले

इफ्फीचे अ‍ॅप गुंडाळले, प्रतिनिधी वैतागले

googlenewsNext

पणजी  - गोव्यात सुरु असलेल्या ४९ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी प्रतिवर्षी मोठ्या थाटामाटात इफ्फी अ‍ॅपचे लाँचिंग केले जाते. यंदाही एका स्वतंत्र कार्यक्रमात इफ्फी अ‍ॅप लाँच केले गेले, मात्र महोत्सव सुरु होउन दोन दिवस उलटले तरी हे अ‍ॅप सुरु होण्याचे नाव घेत नसल्यामुळे आलेले जगभरातील प्रतिनिधी वैतागले आहेत.

प्रतिवर्षी इफ्फीसाठी अ‍ॅपचे लाँचींग केले जाते. यामधून अ‍ॅन्ड्राईड व्हर्जन असलेले हे अ‍ॅप गुगल प्ले स्टोअरमधून आपापल्या स्मार्ट फोनवर डाउनलोड करण्यात येते. यामध्ये चित्रपट महोत्सवाच्या सर्व घडामोडी सहजरित्या समजल्या जातात. विशेषत: कोणता चित्रपट, कोणत्या स्क्रीनवर कधी आणि केव्हा दाखविला जाणार आहे, त्यातील बदल झाले असतील तर ते काय आहेत, याची माहिती या अ‍ॅपद्वारे मिळते. विशेषत: रोजच्या वेळापत्रकासाठी हे अ‍ॅप यूजरफ्रेंडली ठेवण्यात येत असल्यामुळे प्रतिनिधींना फारशी धावपळ करावी लागत नाही. चित्रपट, महोत्सवाच्या आयोजकांकडून होणारे वेगवेगळे कार्यक्रम, ओपन फोरममधील चर्चा, मास्टर क्लासमध्ये कोण येणार, अशा साºया कार्यक्रमांचे अपडेटस या अ‍ॅपमध्ये सहजरित्या उपलब्ध होते. याशिवाय चित्रपटांचे व्हिडिओ, लाईव्ह कार्यक्रमांसोबतच रेड कार्पेटवर येणाºया कलाकारांचे दर्शनही या अ‍ॅपद्वारे पटकन समजले जात होते.

पर्यटन केंद्राची ओळख, परिसरातील हॉटेल्स, खाद्यसंस्कृती, बीच अशा साºया माहितीपूर्ण स्थळांनाही या अ‍ॅपद्वारे भेट देता येत असे. परंतु या साºयावर यंदा पाणी फिरले आहे. सोशल मिडियाचे हे व्यासपीठ इफ्फी प्रतिनिधींसाठी विशेषत: माध्यम प्रतिनिधींसाठी सोयीचे होते. या अ‍ॅपद्वारे सर्व सोशल मिडियाचे व्यासपीठ, हेल्पडेस्कसोबत प्रतिनिधी जोडले जात होते. परंतु महोत्सव सुरु होउन दोन दिवस उलटले तरी हे अ‍ॅप अद्यापही अ‍ॅक्टिव्ह झालेले नाही. प्रतिनिधींचे नाव आणि नोंदणी केलेला ई मेलइफ्फीचे अ‍ॅप गुंडाळले, प्रतिनिधी वैतागले आयडी टाकूनही हे अ‍ॅप सुरुच होत नाही. 

हेल्प डेस्ककडे याबाबत तक्रार नोंदवली असता त्यांनी अ‍ॅपच्या वाटेला जाउ नका, थेट इंटरनेटद्वारे गुगलवर इफ्फी २0१८ असे शोधून तिथे हवी ती माहिती मिळवा,असा सल्ला दिला जातो. इतका महत्वाचा महोत्सव आणि इतक्या छोट्या गोस्टींसाठी जगभरातील प्रतिनिधींना तक्रार करावी लागते, यासारखे दुर्देव नाही.

आॅनलाईन तिकिट काढण्याला मर्यादा
प्रतिनिधींना आॅनलाईन तिकिट काढण्यासाठी तर हे अ‍ॅप अतिशय फायद्याचे होते. बसल्याजागी हव्या त्या चित्रपटाचे तिकिट अ‍ॅपद्वारे काढता येत होते. परंतु अ‍ॅपच अस्तित्वात नसल्यामुळे आॅनलाईन तिकिट काढता येत नाही.

Web Title: Iffi's app wrapped up, the delegation would wait

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.